China Will Take Island Of Diego Garcia :…तर चीन हडपणार दिएगो गार्सिया बेट

China Will Take Island Of Diego Garcia :…तर चीन हडपणार दिएगो गार्सिया बेट

वॉशिंग्टन / लंडन; वृत्तसंस्था : हिंदी महासागरातील दिएगो गार्सिया बेट मॉरिशसला सोपवण्याची तयारी ब्रिटनने चालविली आहे. मॉरिशसवर चीनचे कर्ज आहे. कर्जबाजारी मॉरिशसकडून चीन त्याबदल्यात हे बेटच ताब्यात घेईल आणि त्यावर लष्करी तळ उभारेल, अशी भीती अमेरिकेला आहे. (China Will Take Island Of Diego Garcia)

सध्या दिएगो गार्सियावर अमेरिकेचा लष्करी तळ आहे. हे बेट एका करारान्वये ब्रिटनने अमेरिकेला दिलेले आहे. बेटावर मॉरिशसचा दावा आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयासह संयुक्त राष्ट्रांतही हे बेट मॉरिशसचेच म्हणून फैसला झालेला आहे. संयुक्त राष्ट्रांत भारतानेही मॉरिशसच्या बाजूनेच मतदान केले होते, हे विशेष! (China Will Take Island Of Diego Garcia)

खासदाराकडून एक पर्याय (China Will Take Island Of Diego Garcia)

दिएगो गार्सिया व्हाया मॉरिशस चीनच्या ताब्यात जाऊ नये म्हणून ब्रिटनने पुन्हा 99 वर्षांच्या कराराने ते भाड्याने घ्यावे, असा सल्ला ब्रिटनमधील खासदार इयान डंकन यांनी अमेरिकेच्या नाराजीनंतर आपल्या (ब्रिटन) सरकारला दिला आहे.

कन्याकुमारी ते दिएगो गार्सिया

भारतातील कन्याकुमारी किनारपट्टीहून दिएगो गार्सिया बेट 1 हजार 800 कि.मी. अंतरावर आहे. हिंदी महासागरात चीन निर्माण करू पाहत असलेल्या वरचष्म्याला तोंड देण्यासाठी भारत 2014 पासून व्हिएतनाम, फिलिपाईन्स, इंडोनेशिया व जपानच्या मदतीने व्यूहरचना आखत आलेला आहे.

चीनला का हवेय हे बेट?

  • हिंदी महासागरात भारताची कोंडी करावी म्हणून चीनने 2004 नंतर आफ्रिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत 17 बंदरांमध्ये गुंतवणूक केली आहे.
    लुटारूंच्या धोक्याच्या नावाखाली चीनने हिंदी महासागरात लष्करी जहाजे उतरविण्यास सुरुवात केली.
  • 2016 मध्ये जिबुती येथे लष्करी तळ उभारला आणि 2 हजार सैनिक तैनात केले. पाकचे ग्वादर बंदर, श्रीलंकेतील हंबनटोटा, म्यानमारचे क्योंकप्यू व कोको बेटही ताब्यात घेतले.
  • दिएगो गार्सिया बेट ताब्यात घेतल्यानंतर हिंदी महासागरात भारताला सर्व बाजूंनी घेराव घालण्याचे चीनचे स्ट्रिंग ऑफ पर्ल्स हे धोरण पूर्ण होईल.

मॉरिशसला स्वातंत्र्य; पण…

  • 1965 मध्ये ब्रिटनने मॉरिशसला स्वातंत्र्य बहाल केले. मॉरिशसमधील चागोस बेटे मात्र ताब्यात ठेवली.
  • 1966 मध्ये एका लष्करी करारानुसार यातील दिएगो गार्सिया हे बेट अमेरिकेला वापरायला दिले.

श्रीलंका, पाकप्रमाणे मॉरिशसही चिनी कर्जात

  • चीनने 2016 मध्ये मॉरिशसचे 45 कोटींचे कर्ज माफ केले होते. तेव्हापासून बेटावर तळाची संधी चीन शोधत आहे.
  • 2022 पर्यंत मॉरिशसवर चीनचे सुमारे 14.8 लाख कोटी रुपयांचे कर्ज होते.

60 बेटांत सर्वात मोठा

  • 60 बेटांची एक साखळीच हिंदी महासागराच्या मध्यावर आहे
  • सुमारे 60 चौ.कि.मी. या बेटांचे मिळून क्षेत्रफळ आहे
  • 32 चौ.कि.मी. दिएगो गार्सिया बेटाचे क्षेत्रफळ असून, ते या साखळीतील सर्वात मोठे बेट आहे

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news