Valentine’s day special : इश्क है तो रिस्क है ! परप्रांतीय ‘ती’ तर मराठमोळा ‘त्या’ची हटके लवस्टोरी !

Valentine’s day special : इश्क है तो रिस्क है ! परप्रांतीय ‘ती’ तर मराठमोळा ‘त्या’ची हटके लवस्टोरी !
Published on
Updated on

पुढारी डिजीटल : अन्न, वस्त्र, निवारा या भौतिक गरजानंतर मानवी मनावर गारुड घालणारी भावना म्हणजे प्रेम. आपल्यापैकी प्रत्येकजण अगदी जन्मापासून या भावनेच्या आधारेच मोठा होत जातो. लहानपणी मिळणारं आईचं, कुटुंबाचं निखळ प्रेम. कळते झाल्यावर मित्र मैत्रिणींचे प्रेम आणि वयाच्या एका टप्प्यावर आल्यावर जोडीदाराचे प्रेम.  प्रेमाच्या अनेक छटा आहेत. कधी त्याग करायला लावणारं तर कधी मिळवण्याची उमेद जागवणार प्रेम… अगदी चोरून एकमेकांकडे पाहण्यापासून झालेल्या या प्रवासाची सुरुवात हातात हात घेऊन सप्तपदी पर्यंतचा प्रवास म्हणजे प्रेमाची गोष्ट सुफळ संपूर्ण झाली असे आपण सगळेच समजतो. पण हा प्रवास म्हणावा इतका सोपा कधीच नसतो. या मार्गात समाज जात परिस्थितीचे अनेक अडथळे उभे असतात. अनेकजण या प्रवासात परिस्थिती, समाज या सगळ्यासमोर गुडघे टेकून प्रेमाला कायमची तिलांजली देतात. पण काही असेही असतात जे परिस्थितीशी झगडून अडचणींवर मात करतात.

आजही आम्ही तुमच्याशी अशीच एक भन्नाट लवस्टोरी शेयर करतो आहोत. ज्यामध्ये वेगळी भाषा, चालीरीती आणि राज्य असणा-या दोघांनी एकत्र येत एकत्र राहण्याच स्वप्न पूर्ण केलं. याप्रवासात त्यांचा एकमेकांवरचा विश्वास कामी आलाच पण त्याला सोबत मिळाली ती 'Right to love' चळवलीचीही. त्यांची ओळख कॉलेजमध्ये असल्यापासूनची. आधी मैत्री, मग प्रेम असे सगळे टप्पे पार केल्यानंतर दोघांच्याही मनात लग्नाचे विचार येऊ लागले.

अडथळ्यांची सुरुवात झाली ती इथेच ! ती बिहारी तर तो महाराष्ट्रीयन. भाषेपासून खाण्यापिण्याच्या सवयीपर्यंत कशातच साम्य नाही. पण मनं मात्र जुळलेली. दोघेही कमावते असल्याने तशी अडचण नव्हती. प्रश्न होता तो घरच्यांच्या परवानगीचा. परवानगी कधीच मिळणार नाही यांची खात्री पटल्याने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

अर्थातच त्यांच्या या निर्णयाला सोबत होती ती Right to love ची. गेली ८ वर्षे प्रेमी युगलांना आणि आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना एकत्र आणलं आहे. यासाठी घरच्यांना समजावण्यापर्यंत ते कोर्टाची पायरी चढण्यापर्यंत के अभिजीत आणि Right to love ची टीम काम करते आहे. या जोडीच्या मागेही हीच टीम पुन्हा खंबीरपणे उभी राहिली. आता होती खरा कसोटीचा क्षण. अभिजीत आणि त्यांच्या टीमने या सगळ्या प्रक्रियेतील खाचखळगे या दोघांनाही समजावून सांगितले. … आणि तो दिवस उजाडला २७ डिसेंबर २०२२ ला ही जोडी राज्य, भाषा, जात आणि इतर सामाजिक बंधनं झुगारून देत बौद्ध पद्धतीने लग्नाच्या बेडीत अडकली. त्याच्या घरी या जोडीचं जंगी स्वागत झालं. पण तिच्या घरी मात्र तणावाच वातावरण होतं.

लग्नाच्या काही दिवसांनी ही जोडी पुन्हा पोलिसात हजार झाली. तिच्या घरच्यांनी तिला घरी नेण्यासाठी समजूत काढली. पण तिचा प्रेमावरचा विश्वास अढळ होता. एकमेकांच्या सोबतीने त्यांनी नुकतीच त्यांच्या संसारची सुरुवात केली आहे. 'प्रेम केलंच तर त्याची गोष्ट सुफळ संपूर्ण करण्यासाठी सगळं पणाला लावून प्रयत्न करणं गरजेचं आहे.' असं या दोघांचही मत आहे. ही जोडी आता तिच्या घरच्यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यांच्या प्रयत्नांना लवकरच यश येवो अशा शुभेच्छा आपण त्यानं नक्कीच देऊ शकतो. अर्थात यात त्यांच्या मदतीला अभिजीत के आणि Right to love ची सगळी टीम आहेच.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news