Musafiraa Movie : ‘झिलमिल’ गाण्यातून घडणार ‘मुसाफिरा’ ची सफर (video)

Musafiraa Movie
Musafiraa Movie

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'मुसाफिरा' आणि 'मन बेभान' या उत्स्फूर्तदायी गाण्यानंतर आता 'मुसाफिरा' चित्रपटातील तिसरे गाणे नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. 'झिलमिल' असे या गाण्याचे बोल असून हे बहारदार गाणे सलीम मर्चंट यांनी गायिले आहे. तर या गाण्याचे बोल अदिती द्रविड हिचे असून साई -पियुष यांनी हे गाणे संगीतबद्ध केलं आहे. ( Musafiraa Movie )

संबंधित बातम्या 

स्कॉटिश हायलँड्सच्या निसर्गरम्य वातावरणात हे गाणे चित्रित करण्यात आले असून डोळ्यांचे पारणे फिटणारे आहे. पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांची घनिष्ट मैत्री या गाण्यातून समोर येत आहे. सफरीवर निघालेले हे 'मुसाफिरा' जीवनाचा पुरेपूर आनंद लुटताना दिसत असून या गाण्यातून मैत्रीतील प्रेमही झळकत आहे. हे गाणे जितके सुरेल आहे, तितकेच चित्रीकरणस्थळही आकर्षक आहे.

आनंद पंडित मोशन पिक्चर्स, ऐश मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रोडक्शन आणि गुझबम्प्स एंटरटेन्मेंट प्रस्तुत 'मुसाफिरा'चे दिग्दर्शन पुष्कर जोग यांनी केलं आहे. गाण्याबद्दल पुष्कर जोग यांनी म्हटलं आहे की,"'झिलमिल' हे गाणे खरंच खूप भारी असून स्कॉटिश हायलँड्सच्या एका सुंदर ठिकाणी याचे चित्रीकरण केलं आहे. कोणीही प्रेमात पडेल असे हे स्थळ आहे." ( Musafiraa Movie )

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news