सुलतान ऑफ दिल्ली
सुलतान ऑफ दिल्ली

मिलन लुथरिया यांचा ‘सुलतान ऑफ दिल्ली’ सज्ज; धमाकेदार टिझर रिलीज

Published on

पुढारी ऑनलाईन : मिलन लुथरिया यांची सत्तेचा रस्ता, हृदयस्पर्शी मैत्री आणि 60 च्या दशकातील आकर्षण असलेला आगामी 'सुलतान ऑफ दिल्ली' सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरीजच्या नुकताच रिलीज झालेल्या टिझरने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अर्णब रे यांच्या सुलतान ऑफ दिल्ली: एसेन्शन या पुस्तकावर आधारित ही वेबसीरिज रिलायन्स एंटरटेनमेंटद्वारे निर्मित आणि मिलन लुथरिया दिग्दर्शित केली आहे. टिझरमध्ये मौनी रॉयच्या डान्ससोबत विनय पाठक आणि निशांत दहिया यांचे धमाकेदार अॅक्सन सीन दाखवण्यात आले आहेत. यामुळे चाहत्यांना या बेवसीरीज उत्सुकता लागून राहिली आहे.

जुन्या भारताच्या मोहकतेची पुर्नकल्पना करून आणि स्क्रिनवर एक व्हिज्युअल सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी मिलन लुथरियाने ओटीटीवर दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. लार्जर दॅन लाइफ मास एंटरटेनर 'सुलतान ऑफ दिल्ली' मध्ये ताहिर राज भसीन, अंजुम शर्मा, ज्येष्ठ अभिनेते विनय पाठक आणि निशांत दहिया, अनुप्रिया गोएंका, मौनी रॉय, हरलीन सेठी आणि मेहरीन पिरजादा सारखी तगडी स्टारकास्ट दिसणार आहे.

दिग्दर्शक मिलन लुथरिया याविषयी म्हणतात की, ही माझी पहिली वेब सिरीज आहे. ६० च्या दशकात तयार केलेले सेट यात ग्लॅमर, अॅक्शन, संगीत, पंची वन लाइनर्स आणि मनोरंजन अशी पॉवर पॅक सीरिज असणार आहे. 'सुलतान ऑफ दिल्ली' हा असाच एक सुंदर प्रवास आहे आणि मला डिस्ने+ हॉटस्टारसोबत भागीदारी करताना खूप आनंद होत आहे. सुलतान ऑफ दिल्ली लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news