Natasha Dalal Pregnant : नताशा-वरुण धवन होणार आई-बाबा? प्रेग्नेंसीच्या चर्चांना उधाण (video)

Natasha Dalal Pregnant
Natasha Dalal Pregnant
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल यांची क्यूट जोडी लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. 'भेडिया' चित्रपटातील वरुणच्या अभिनयाचे चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं. दरम्यान, मुंबईतील एका क्लिनिकच्या बाहेर वरुण आणि नताशा स्पॉट झाले आहेत. यामुळे चाहत्यांनी नताशा प्रेग्नंन्ट ( Natasha Dalal Pregnant ) असून लवकरच दोघेजण आई- वडील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, दोघांनी याबाबतची अधिकृत माहिती दिलेली नाही.

अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी मुंबईतील एका क्लिनिकला भेट दिली. यावेळी दोघेजण पॉपाराझीच्या कॅमेऱ्यात कैद झाले. यावेळी नताशाने ब्लॅक कलरचा मिनी शॉर्ट ड्रेसमध्ये तर वरूण निळ्या रंगाच्या टिशर्ट आणि ब्लॅक पॅन्टमध्ये खूपच स्मार्ट दिसत होते. यावेळी दोघेजण घाईगडबडीत क्लिनिकमधून बाहेर पडून कारमधून जाताना दिसतात. यानंतर चाहत्यांनी नताशा प्रेग्नेन्ट ( Natasha Dalal Pregnant ) असल्यानेच दवाखान्यात आली असल्याचा अंदाज लावला आहे.

'नताशा प्रेग्नेन्ट आहे का?', 'वरुण आणि नताशा बेबी प्लॅन करत आहे का?' यासारखे काही प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहेत. तर काही युजर्सनी दोघांच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव करत अभिनंदन केले आहे. मात्र, वरुण आणि नताशाकडून याबाबतची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

वरुण आणि नताशा दलाल पालक होणार असल्याची अफवा पसरणे ही पहिलीच वेळ नाही. याआधीही ते आई-वडील होणार असल्याची चर्चा पसरली होती. यानंतर वरूणने यावर स्पष्टीकरण देत तसे काहीही नसल्याचे सांगितले होते. वरुण आणि नताशाने २०२१ मध्ये लग्न केले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news