सप्तपदी नसेल तर हिंदू विवाह अवैध : सर्वोच्च न्यायालय

सप्तपदी नसेल तर हिंदू विवाह अवैध : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : हिंदू विवाह ही पवित्र प्रक्रिया असून ती पारंपरिक पद्धतीनुसार विधी करूनच व्हायला हवी. असे न केल्यास तो विवाह वैध ठरत नाही, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. लग्न हा जेवणे-खाणे, गाणी, नृत्य यापुरता मर्यादित नसून या सोहळ्याचे पावित्र्य राखूनच तो व्हायला हवा, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने कमर्शियल पायलट असलेल्या जोडप्याच्या याचिकेवरील सुनावणीत हे मत नोंदवले. न्या. बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांनी म्हटले आहे की, हिंदू विवाह हा एक संस्कार आहे. त्याचे पावित्र्य राखूनच तो करायला हवा. विवाह सोहळा हे काही गाणी बजावणी व खाणे-पिणे करण्यापुरताच सोहळा नाही. सप्तपदी होत नाही तोपर्यंत असा विवाह वैध ठरत नाही. लग्न हा काही व्यवहार नाही. भारतीय समाजात कुटुंब हा मूळ घटक आहे. विवाहसंस्काराच्या माध्यमातून एक पुरुष व एक स्त्री यांना पती व पत्नीचा दर्जा मिळतो व कुटुंब तयार करण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू होते. सर्वोच्च न्यायालयाने पुढे म्हटले आहे की, हिंदू विवाह कायद्यानुसार जे विधी नमूद करण्यात आले आहेत, ते व्यक्तींची आत्मिक शुद्धी करणारे आहेत. ते तेवढ्याच गांभीर्याने घ्यायला हवेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news