सलमान सोसायटी : शिक्षणाच महत्व शिकवणार ‘सकाळी लवकर उठायचं’ गाणं भेटीला

सलमान सोसायटी
सलमान सोसायटी

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर सध्या मराठी 'सलमान सोसायटी' या चित्रपटाची चर्चा आहे. नुकतेच चित्रपटातील धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येताच चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. आता 'सलमान सोसायटी' चित्रपटाचं नवीन गाणं सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या 

नुकत्याच रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये इमोशन, ड्रामा आणि कॉमेडीची किनार पाहायला मिळाली. हा चित्रपट समाजातील अनाथ मुले आणि शिक्षणापासून वंचित मुलांवर भाष्य करतो. ट्रेलरमध्ये लहानग्यांची शिक्षणासाठीची धडपड लक्ष वेधुन घेते. तीच धडपड आता नवीन गाणं 'सकाळी लवकर उठायचं' मध्ये दिसत आहे. हे गाणे गायका देवकी भोंडवे यांनी गायिले असुन या चित्रपटात त्यांनी एक मुख्य भुमिका साकारली आहे.

दिग्दर्शक कैलाश पावर आणि निर्मात्यांनी भटक्या, अनाथ मुलांची व्यथा सर्वाना समोर यावी आणि यावर प्रबोधन होवून मुलांना योग्य ते शिक्षण मिळावे यासाठी हा प्रयत्न केला आहे. अवंतिका दत्तात्रय पाटील प्रस्तुत सलमान सोसायटी' चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार यांनी केलं आहे. निर्मिती रेखा सुरेंद्र जगताप, शांताराम खंडू भोंडवे व वैशाली सुरेश चव्हाण यांनी प्राजक्ता इन्टरप्राईजेसच्या बॅनरअंतर्गत केली आहे.

भारत देश साक्षर होईल, तेव्हा भारताचा विकास होईल या टॅगलाईनवर आधारीत हा चित्रपट आहे. चित्रपटाला संगीत श्रेयस आंगणे, मॅक्सवेल फर्नांडिस आणि मिलिंद मोरे यांनी दिले असुन डीओपी फारूक खान हे आहेत. या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वाना प्रभावित करणारा गौरव मोरे एका वेगळ्या आणि महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तसेच पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार ही बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत असणार आहेत.

चित्रपटामध्ये उपेंद्र लिमये पाहुण्याच्या भूमिकेत आहे. तसेच चित्रपटामध्ये देवकी भोंडवे, वनिता खरात, नम्रता संभेराव, कुणाल मेश्राम, शेषपाल गणवीर, नरेंद्र केरेकर, तेजस बने आदी कलाकार महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. 'सलमान सोसायटी' हा चित्रपट १७ नोव्हेंबर २०२३ ला चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news