राजधानीतील प्रदूषणाची समस्या ‘जैसे थे’! १४ वर्षांनी सर्वोच्च कमाल तापमानाची नोंद  

राजधानी दिल्ली प्रदूषण
राजधानी दिल्ली प्रदूषण

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीतील वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) सलग चौथ्या दिवशी मंगळवारी सकाळी 'अत्यंत खराब' नोंदवण्यात आला. सकाळपासूनच वातावरणात धुरक्याची चादर पसरल्याचे दिसून आली. हवामान खात्याने हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान राजधानीचे किमान तापमान १७.२ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. या महिन्यातील सरासरी तापमानाच्या तुलनेत हे तापमान तीन अंशाने अधिक आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) आकडेवारीनूसार दिल्लीचा सरासरी एक्यूआय सकाळी ३४८ नोंदवण्यात आला. शनिवारी, रविवारी आणि सोमवारी एक्यूआय अनुक्रमे ३८१, ३३९ आणि ३५४ होता. सोमवारी दिल्लीचे कमाल तापमान ३३ अंश सेल्सियस नोंदवण्यात आला. २००८ नंतर नोव्हेंबर महिन्यातील हे सर्वाधिक अधिक तापमान असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. सोमवारी देखील दिल्लीतील तापमान सरासरी चार अंश सेल्सियसने अधिक नोंदवण्यात आले.

राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील एनसीआर एक्यूआयदेखील अत्यंत खराब श्रेणीत आहे. नोएडाचा एक्यूआय ३५४,तर गुरुग्रामचा एक्यूआय ३२६ नोंदवण्यात आला.दिल्लीतील पुसा पसिरातील एक्यूआय ३२२, धीरपूर ३३९, लोधी रोड ३१७, दिल्ली विमानतळ ३२३, मथुरा रोड ३३८ यासोबत दिल्ली विद्यापीठ परिसरात ३३६ आणि आयआयटी दिल्ली परिसराचा एक्यूआय २९३ नोंदवला गेला.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news