राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे गोव्यात आगमन
पणजी; पुढारी वृत्तसेवा : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे दोन दिवसांच्या भेटीवर आज मंगळवार (दि. १४ जून) रोजी गोव्यात दाखल झाले आहेत. राज्यपाल श्रीधरन पिल्लई व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे विमानतळावर स्वागत केले. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर व गोवा राज्याचे शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो उपस्थित होते.
रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्या गुरूवारी (दि. १५ जून) रोजी सकाळी १० वाजता दोनापावला येथील राज भवनाच्या आवारामध्ये नव्या राजभवनाची पायाभरणी होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेली राजभवनाची इमारत ही अनेक वर्षांपूर्वी पोतुगीज काळामध्ये बांधलेली आहे. सदर इमारत तशीच ठेवून तिच्या बाजूलाच नवीन राजभवन बांधण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या नव्या राजभवनाची पायाभरणी होणार आहे.
हेही वाचलंत का?