वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा आणि महाविद्यालयेही वाढणार

Medical Colleges
Medical Colleges

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : देशातील ग्रामीण भागात डॉक्टरांची सेवा विस्तारण्याच्या उद्देशाने वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील डॉक्टरांचा तुटवडा भरून काढण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील मेडिकलच्या जागा वाढवल्या जाणार आहेत. याबरोबरच नवी महाविद शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रत्येक राज्यामध्ये 10 लाख लोकसंख्येमागे 100 एमबीबीएस डॉक्टर असावेत, हे गुणोत्तर राखण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढविल्या जाणार आहेत. त्यानुसार देशातील सर्व राज्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करणे, नवीन वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करणे, सध्या असलेल्या अभ्यासक्रमांच्या जागा वाढविणे त्याचबरोबर मूल्यांकन आणि गुणात्मक नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांमध्ये देशातील सर्व राज्यांमधील वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागा वाढण्याबरोबरच वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे जागा वाढल्या तर याचा फायदा आरोग्यसेवेला होणार आहे. तसेच राज्यातील विद्यार्थ्यांनाही अधिकाधिक संधी या निर्णयामुळे मिळणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news