‘इथे’ सर्वप्रथम होणार नववर्षाचे स्वागत

नववर्षाचे स्वागत
नववर्षाचे स्वागत

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आता अवघे जग सज्ज झाले आहे. 2023 या सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या आशा-आकांक्षा घेऊन घेत असलेल्या 2024 या नूतन वर्षाचे 31 डिसेंबरला मध्यरात्री बारा वाजता जल्लोषात स्वागत केले जाते. जगात कुठे नव्या वर्षाचे प्रथम आगमन होते हे तुम्हाला माहिती आहे का? त्याबाबतची ही माहिती…

सर्वात प्रथम नवे वर्ष सुरू होते म्हणजेच रात्रीच्या बाराचे ठोके पडतात ते टोंगा, समोआ आणि किरीबाती या पॅसिफिक महासागरातील बेटांवर. त्यावेळी आपल्याकडे 31 डिसेंबरच्या दुपारचे साडेतीन वाजलेले असतात. त्यानंतर न्यूझीलंडच्या चाथम आयलंडवर नव्या वर्षाचे आगमन होते. न्यूझीलंडच्याच ऑकलंड शहरात दरवर्षी जगातील पहिला जल्लोष पाहायला मिळत असतो. त्यावेळी आपल्याकडे 31 डिसेंबरच्या सायंकाळचे साडे चार वाजलेले असतात.

या शहरातीलच छायाचित्रे जगभर व्हायरल होत असतात. वेलिंग्टन, नुकुआलोफा, अपिया या शहरांमध्येही असा जल्लोष सुरू होतो. त्यानंतर फिजी तसेच रशियाच्या काही भागात नववर्षाचा जल्लोष सुरू होतो. ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न, सिडनी, कॅनबेरा शहरातही मग हा जल्लोष पाहायला मिळतो. त्यानंतर जपान, दक्षिण कोरियामध्ये नववर्षाचे आगमन होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news