‘स्वराज्याच्या मातीत दडलेला अंगार…’; सर्वश्रेष्ठ गुप्तहेराची यशोगाथा ‘बहिर्जी’

बहिर्जी
बहिर्जी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'स्वराज्याच्या मातीत दडलेला अंगार हाय… बहिर्जी म्हणजे शिवबाची तळपती तलवार हाय… ' अशी टॅगलाईन असणाऱ्या 'बहिर्जी' या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल जनार्दन जाधव यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या 

खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक योजनेमध्ये माती आड लपलेल्या अंगारसारखे धगधगते काम करणारे बहिर्जी नाईक इतिहासात फारसे दिसलेही नाही. त्यांचीच यशोगाथा "बहिर्जी' या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे. 'बहिर्जी' च्या मोशन पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली असून चित्रपटात कलाकार कोण असतील आणि हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस कधी येईल, याविषयी सुद्धा प्रेक्षकांमध्ये कमालीचे कुतूहल आहे.

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव म्हणतात की, " छत्रपती शिवरायांचा इतिहास म्हणजे, आज आपल्यासाठी हिमनगाचे टोक आहे. बऱ्याच घटना काळाच्या उदरात अज्ञात आहेत. अशा काळात महाराजांची प्रत्येक योजना यशस्वी होण्यासाठी त्या योजनेचा पाया बनून राहिलेले बहिर्जी नाईक हे जगातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेर ठरतात. त्यांच्या योजना इतक्या गुप्त असायच्या की, त्यांचा मागोवा घेणेसुद्धा शक्य नव्हते. मात्र, अशा काळात स्वराज्य हे स्वप्न या मातीत रुजवणारे शिवराय आणि या स्वप्नासाठी जीव उधळायला सुद्धा तत्पर असणारे मावळे या साऱ्यांचे अवलोकन केले. तर त्यातूनच 'बहिर्जी' नावाची वीण हळुवार उलगडत जाते. हेच दाखवण्याचा प्रयत्न 'बहिर्जी' या चित्रपटातून आम्ही केला आहे.

ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांच्या मार्गदर्शनातून आणि शिवरायांच्या जीवनातील ऐतिहासिक घटनांचा वस्तुनिष्ठ वेध घेऊन या सिनेमाची निर्मिती केली जात आहे. सध्या या चित्रपटाचे पहिले पोस्टर भेटीला आलं असून लवकरच याबाबतचे सारे चित्र स्पष्ट करू." असेही ते यावेळी म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news