The Kerala Story वरुन पीएम मोदींचा काॅंग्रेसवर निशाणा, काँग्रेसनं व्होट बँकेसाठी दहशतवादाला पाठबळ दिलं

pm modi
pm modi

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बेल्लारीमध्ये निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांनी 'द केरला स्टोरी' ('The kerala story) चा उल्लेख करत काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले-केरला स्टोरी केवळ एका राज्यात झालेल्या दहशतवादी कारवायांवर आधारित आहे. देशाचे इतके सुंदर राज्य, जिथे लोक इतके मेहनती आणि प्रतिभावान आहेत, त्या केरळमधील दहशतवादी कारवायांचा खुलासा या चित्रपटात करण्यात आला आहे. बॉम्ब, बंदूक आणि पिस्तुलचा आवाज तर ऐकू येतोच, पण समाजाला आतून पोखरण्यासाठी कारवायांचा आवाज ऐकू येत नाही. अशा दहशतवादी कारवायांवर बनलेला चित्रपट 'केरला स्टोरी' सध्या खूप चर्चेत आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, देशाचे दुर्देव पाहा , काँग्रेस आज समाजाला उद्धस्त करणाऱ्या दहशतवादी प्रवृत्तीसोबत उभी आहे. इतकचं नाही तर असा दहशतवादी प्रवृत्तीशी काँग्रेस, मागील दरवाजाने राजकीय सौदेबाजी करत आहेत. कर्नाटकातील लोकांना यासाठी काँग्रेसपासून सावधान राहायला हवं. हे लोक चित्रपट रोखत आहेत. जेव्हा मी काँग्रेसला असे करताना पाहतो, तेव्हा मला आश्चर्य वाटतं.

दरम्यान, 'द केरला स्टोरी' (THE KERALA STORY) या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. केरळमधील डाव्या लोकशाही आघाडीसह काँग्रेसने या चित्रपटावर हेट स्पीचचा आरोप केला होता. निझाम पाशा आणि कपिल सिब्बल या वकिलांनी या चित्रपटावर बंदीसाठी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news