The Kerala Story : द केरल स्टोरीची बॉक्स ऑफिसवर कमाईची धुवाँधार बॅटिंग

Adah Sharma
Adah Sharma
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : द केरल स्टोरी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलाय. सुदीप्तो सेन दिग्दर्शित चित्रपटात अदा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाने मंगळवारी बाजी मारत सिंगल डेला दमदार कमाई केलीय. द केरल स्टोरीने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. मंगळवारी सलमान खानचा 'किसी का भाई, किसी की जान' आणि ऐश्वर्या रायच्या 'पोन्नियिन सेल्वन-२' लादेखील मागे टाकलं.

कमाईच्या बाबतीत चित्रपटाने आठ कोटींपासून सुरुवात केली होती. पण, प्रत्येक आठवड्याच्या शेवटी सुदीप्तो सेनचा चित्रपट कमाई करत गेला. चित्रपटाने सोमवार ते बुधवारपर्यंत बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली.

'द केरल स्टोरी'ने पहिल्या वीकेंडपर्यंत बॉक्स ऑफिस ३५.९२ कोटींची कमाई केली. किसी का भाई, किसी की जान, ऐश्वर्याचा पोन्नियन सेल्व्हन २ चा बॉक्स ऑफिसवर मागे पडला. सोमवारी चित्रपटाने १०.७ कोटींच्या जवळपास कमाई केली.

मंगळवारी कमाई थोडी आणखी वाढली. 'द केरल स्टोरी'ने सिंगल डेला बॉक्स ऑफिसवर जवळपास १०.९९ कोटींचा बिझनेस केला. पाच दिवसात ५६.७१ कोटींचे नेट कलेक्शन केलं. वर्ल्डवाईड या चित्रपटाने ५४ कोटींची कमाई केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news