अमरनाथमध्ये हिमलिंग संपूर्ण आकारात प्रकटले

अमरनाथमध्ये हिमलिंग संपूर्ण आकारात प्रकटले

जम्मू; पुढारी वृत्तसेवा : काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये अंगाची लाही लाही करणार्‍या तापमानामुळे वातावरणातील उष्मा वाढला होता. तापमानाने 132 वर्षांतील विक्रम मोडला होता. समुद्रसपाटीपासून 14 हजार फुटांवर स्थित अमरनाथ गुंफेतील हिमलिंग संपूर्ण अवतारात प्रकटले आहे.

अमरनाथ यात्रेपूर्वीच भाविकांनी हिमलिगांचे दर्शन घेऊ नये यासाठी सुरक्षा रक्षकांचे पथक तैनात करण्यात आले आहे. अमरनाथ श्राईन बोर्डाने हिमलिंगाचा फोटो जारी केला असून हिमलिंग संपूर्ण आकारात प्रकटले असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाढत्या तापमानामुळे जगभरातील हिमनग वितळत असताना दुसरीकडे हिमलिंग 20 ते 22 फूट आकारात प्रकटले आहे हे विशेष! अमरनाथ यात्रा 30 जूनपासून होणार असून 1 जुलै रोजी पहिल्यांदा भाविक हिमलिंगाचे दर्शन घेतील. वाढत्या तापमानामुळे हिमलिंगाची आकार कमी होणार असल्याचा दावा केला असताना 14 हजार 500 फूट उंचीवर असलेल्या हिमलिंगाने हा दावा खोटा ठरविला आहे.

गुंफेपर्यंत पोहोचल्याचा काही भाविकांचा दावा सध्या भाविक अमरनाथ गुंफेपर्यंत जाऊ शकत नाहीत. गुफांच्या संरक्षणासाठी पोलिसांचे पथक पोहोचले आहे. काही पोलिसांनी हिमलिंगाचे फोटो काढले आहेत. गेल्यावर्षी पहिल्यांदा हिमलिंगाच्या सुरक्षेसाठी पोलिस तैनात केले होते ते योग्यच असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, गुंफेपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झालो असल्याचा दावा काही भाविकांनी केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news