कुरुंदवाडलाही दूधगंगेतून शासनाने पाणी द्यावे : शहरप्रमुख सावगावे

मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कुरुंदवाड शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे
मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कुरुंदवाड शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे
Published on
Updated on

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा – कृष्णा नदीच्या पाणी योजनेतून गेल्या अनेक वर्षापासून पाणी पुरवठा केला जातो. कृष्णेचे पाणी घेऊन पंचगंगा प्रदूषित करणाऱ्या इचलकरंजीकरांना दूधगंगेतून पाणी देत असाल तर पंचगंगेचा प्रदूषित पाणी पिणाऱ्या आम्हा कुरुंदवाडकरांनाही दूधगंगेचे दतवाड येथून दूधगंगा पाणीपुरवठा योजना करण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कुरुंदवाड शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.

दरम्यान, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार असल्याचे शहर प्रमुख सावगावे यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत पुढे बोलताना शहरप्रमुख सावगावे म्हणाले, पंचगंगा नदी ही उगमापासून ते संगमापर्यंत काही वर्षांपूर्वी स्वच्छ आणि निर्मळपणे वाहत होती. मात्र काही वर्षांपूर्वी इचलकरंजीकरांच्या शहरातील औद्योगिक आणि रासायनिक पाण्यामुळे ती गटारगंगा बनली आहे. हे प्रदूषित पाणी संगमाजवळ कृष्णा नदीत मिसळते. या ठिकाणीच कुरुंदवाड शहराची सव्वाशे वर्षांपूर्वीची सायकल पाणी योजना पाण्याचा उपसा करते हे प्रदूषित पाणी आम्हा कुरुंदवाडकारांना प्यावे लागत आहे.

माजी तालुकाप्रमुख दयानंद मालवेकर म्हणाले, कुरुंदवाड कृष्णा घाटालगतच असणाऱ्या मजरेवाडी हद्दीतून कृष्णा नदीचे पाणी इचलकरंजी शहराला गेल्या अनेक वर्षापासून पुरवठा केला जात आहे. इचलकरंजीकरांनी दूधगंगा नदीतून ही पाण्याची मागणी केली आहे. कृष्णा आणि दूधगंगा या दोन नद्यांचे पाणी घेऊन दुप्पट प्रदूषित पाणी पंचगंगेत सोडून आम्हावर पुन्हा अन्याय करण्याचा हा प्रकार आहे. पंचगंगेबरोबरच बस्तवाडपर्यंत कृष्णा नदी ही पूर्णपणे गटार नदी होणार आहे. त्यामुळे आम्हा कुरुंदवाडकारांचे आरोग्य बिघडून जाणार आहे. तरी शासनाने इचलकरंजीला दूधगंगा नदीचे पाणी देण्याचा निर्णय घेतल्यास कुरुंदवाड शहरालाही दत्तवाड येथून दूधगंगा पाणीपुरवठा योजना करण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी केली.

यावेळी राजू आवळे, सुहास पासोबा यांनी शहराची एक पाणी योजना रखडली आहे. निदान दूधगंगा पाणी योजनेची नवीन प्रक्रिया करून नवा ठेकेदार नेमून कुरुंदवाड शहराला पाणी दिल्यास नवल आहे. ते शासनाने मंजूर करावे असे सांगितले. यावेळी राजेंद्र बेले, आप्पासाहेब भोसले, उपशहर प्रमुख संतोष नरके, आप्पासाहेब गावडे, आयुब पट्टेकरी, मिलिंद गोरे, दत्तात्रय कामत, रामचंद्र मोहिते, अफजल महात, अनिकेत बेले आदी शिवसैनिक उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news