धाकट्या बहिणीवर आईचा जीव; थोरलीने केली घरातच चोरी!

File Photo
File Photo

नवी दिल्ली : आईचे आपल्यापेक्षा धाकट्या बहिणीवर अधिक प्रेम असल्याने जळफळाट होत असल्याने थोरल्या बहिणीने चक्क आपल्याच घरी चोरी करीत धाकटीच्या लग्नासाठी आईने जमा केलेल्या दागिन्यांची व रोख रकमेची चोरी केल्याचा प्रकार दिल्लीत घडला.

दिल्लीच्या उत्तमनगर भागात हा प्रकार घडला. श्वेता असे या चोरी करणार्‍या ३१ वर्षीय मुलीचे नाव आहे. तिची आई कमलेश हिचे श्वेताच्या धाकट्या बहिणीवर अधिक प्रेम असल्याचा तिला आधीपासूनच संशय होता. त्यातच धाकट्या बहिणीच्या लग्नासाठी जमा केलेल्या दागिन्यांमुळे तर तिला खात्रीच झाली. याच जळफळाटातून श्वेताने आईच्या घरात बुरखा घालून घुसत प्रवेश केला व घरातील दागिने व 25 हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून घरात घुसलेल्या बुरखाधारी महिलेचा शोध घेतला असता ती तक्रारदार कमलेश यांची थोरली मुलगी श्वेताच निघाली. तिने चोरी केल्याची कबुली दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news