दिल्लीहून दोहाकडे जाणारे विमान वळविले पाकिस्तानातील कराचीकडे, नेमकं काय घडलं…

दिल्लीहून दोहाकडे जाणारे विमान वळविले पाकिस्तानातील कराचीकडे, नेमकं काय घडलं…

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज सकाळी दिल्लीहून दोहाकडे जाणारे QR579 विमान अचानकपणे कराचीकडे वळविण्यात आले. कारण, कार्गो होल्डमधील वातावरणात झालेल्या बदलामुळे अचानक हा निर्णय घेण्यात आला. तिथे धुराचे लोट आढळून आले होते. कराचीमध्ये हे विमान सुरक्षितपणे उतरविण्यात आले असून प्रवाशांना आपत्कालीन सुविधा पुरविण्यात आल्या आहे, अशी माहिती कतार एअरवेजने दिली आहे.

सध्या या घटनेची चौकशी सुरू आहे. विमानातील प्रवाशांना दोहा येथे नेण्यासाठी दुसऱ्या विमानाची सोय करण्यात येत आहे. या विमानात १०० हून अधिक प्रवासी असून टेक्निकल कारणाने हे विमान उतरविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.  यासंदर्भात कतार एअरवेजने म्हटले आहे की, "प्रवाशांच्या गैरसोईबद्दल आम्ही दिलगीर आहोत. त्यांच्या पुढील प्रवासासाठी नक्कीच मदत केली जात जाईल."

हे वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news