बातमी परीक्षेची ! ‘नीट-यूजी’च्या अर्जांसाठी 9 मार्चपर्यंत मुदत

बातमी परीक्षेची ! ‘नीट-यूजी’च्या अर्जांसाठी 9 मार्चपर्यंत मुदत

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (एनटीए) वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा-पदवीपूर्व (नीट-यूजी) ही परीक्षा 5 मे रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यासाठी 9 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. एमबीबीएस, बीएएमएस अशा विविध वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठी नीट-यूजी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येते. तसेच चार वर्षांच्या बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीही ही परीक्षा द्यावी लागणार आहे. एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, 5 मे रोजी परीक्षा होणार आहे; तर 14 जून रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. मराठीसह एकूण 13 भाषांमध्ये ही परीक्षा देता येते. परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम, शुल्क आदी तपशीलही जाहीर करण्यात आला आहे. 9 मार्चपर्यंत अर्ज भरल्यानंतर त्यातील दुरुस्तीसाठी संधी दिली जाणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news