देशाचा विकासदर सहा टक्के राहण्याचा ‘फिच’ चा अंदाज

देशाचा विकासदर सहा टक्के राहण्याचा ‘फिच’ चा अंदाज

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर सहा टक्के राहील, असा अंदाज जागतिक स्तरावरील पतमापन संस्था 'फिच' ने व्यक्त केला आहे. याआधी या संस्थेने 6.2 टक्के विकासदराचा अंदाज वर्तविला होता. चढे व्याजदर तसेच महागाईचा परिणाम विकासदरावर होणे अटळ असल्याचे 'फिच' ने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

दरम्यान, पुढील आर्थिक वर्षातील जीडीपी दराचा अंदाज देखील 6.9 टक्क्यांवरुन 6.7 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. भारतासाठीचे बीबीबी उणे हे रेटिंग पतमापन संस्थेने कायम ठेवले आहे. खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे विकासाला गती मिळण्याची शक्यता असल्याचे सांगतानाच आगामी काळात वित्तीय तूट कमी होण्याचा अंदाजही 'फिच' कडून वर्तविण्यात आला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news