थंडी परतणार ! राज्यातील तापमान बुधवारपासून घटणार

थंडी परतणार ! राज्यातील तापमान बुधवारपासून घटणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  उत्तर भारतात पश्चिमी चक्रवाताचा परिणाम अजूनही तीव्र असल्याने त्या भागातून राज्यात शीतलहरी येतच आहेत. त्यामुळे येत्या बुधवारपासून राज्यातील किमान तापमानात पुन्हा 2 ते 3 अंशांनी घट होईल. कमाल तापमानात मात्र फारसा फरक दिसणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने रविवारी वर्तविला. उत्तर भारतातील थंडीची सर्वांत मोठी लाट यंदा राहिली आहे. दर चार दिवसाला पश्चिमी चक्रवात त्या भागात तयार होत आहे. त्यामुळे काश्मीरपासून पंजाब, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशपर्यंतचा भाग अजूनही गारठलेला आहे. त्या भागातून महाराष्ट्रात शीतलहरींचा प्रवास सुरू आहे. त्यामुळे राज्यातील वाढलेल्या किमान तापमानात पुन्हा किंचित घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

विदर्भात पावसाचा जोर…
गेले दोन-तीन दिवस राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला होता. मात्र विदर्भ वगळता उर्वरित राज्यात पावसाची शक्यता मावळली आहे. सोमवार-मंगळवारी त्या भागात गारपिटीसह हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात किंचित घट होईल असा अंदाज आहे.

रविवारचे राज्याचे किमान तापमान..
पुणे 11.6, जळगाव 13, कोल्हापूर 18.5, महाबळेश्वर 16.6, मालेगाव 15.4, नाशिक 12, सांगली 17.7, सातारा 14.7, सोलापूर 18.6, छत्रपती संभाजीनगर 14.6, परभणी 18.5, नांदेड 20.8, अकोला 20.2, नागपूर 18.6.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news