शहर सीसीटीव्हींच्या नजरेच्या टप्प्यात

शहर सीसीटीव्हींच्या नजरेच्या टप्प्यात

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात दुसर्‍या टप्प्यात 2 हजार 930 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या मान्यतेने या कॅमेर्‍यांची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यासाठी 169 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या विद्युत विभागाचे सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले यांनी सांगितले.
महापालिकेने या पूर्वी 2 हजार 490 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तर, स्मार्ट सिटीने 3 हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.

माजी नगरसेवक, सामाजिक संघटना व नागरिकांनी मागणी केल्यानुसार महापालिकेने पोलिसांची परवानगी घेऊन आणखी 2 हजार 930 सीसीटीव्ही कॅमेरे बसवत आहे. शहरातील वर्दळीच्या चौक, रुग्णालय, शाळा, मंडई आदी विविध 500 ठिकाणी 2 हजार 800 कॅमेरे उभारण्यात येतील. दहा ठिकाणी वाहनांचे वेगावर लक्ष देणारे कॅमेरे लावण्यात येतील. तर, बीआरटीएस मार्गावर विविध 60 ठिकाणी 120 कॅमेरे लावण्यात येणार आहे. असे एकूण 2 हजार 930 कॅमेरे विविध 570 ठिकाणी लावण्यात येणार आहेत. लवकरच हे काम सुरू केले जाणार आहे, असे सहशहर अभियंता गलबले यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news