राज्यातील सर्वांत मोठी पोलीस भरतीप्रक्रिया आज पूर्ण होणार

file photo
file photo
Published on
Updated on

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="ASC" orderby="post_date" view="circles" /]

मुंबई : रणधीर कांबळे : राज्यातील सर्वात मोठ्या पोलीस भरतीची १५ फेब्रुवारी २०२३ सुरू झालेली चाचणीची १६ एप्रिलला अंतिम प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळी वैद्यकीय पथकांची चोख व्यवस्था ठेवल्याने या प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. राज्यातील सर्वात मोठी पोलीस भरती यंदा करण्यात आली असून ५,६३,४५१ पोलीस कॉन्स्टेबल तर १,१७,८४४ पोलीस चालकांसाठी भरती पार पडली आहे.

पोलीस भरती चाचणीवेळी अनेकदा गडबड गोंधळ झालेला पहायला मिळतो. मागच्या भरतीवेळी चाचणी प्रक्रियेदरम्यान जवळजवळ ६ जणांचे मृत्यू झाल्याने पोलीस विभागाला टिकेचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यावेळी पोलीस सर्जन डॉक्टर कपिल पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली वैद्यकीय पथक पहाटे ५ वाजल्यापासून मैदानावर तैनात ठेवण्यात आले होते.

या बाबत 'दैनिक पुढारी'सोबत बोलताना डॉक्टर कपिल पाटील म्हणाले की, यंदा आम्ही पोस्ट मार्टम विभागातील १३ डॉक्टरही सज्ज ठेवले होते. तसेच मैदानावर असणाऱ्या सर्व परिक्षकांना सीपीआरचे ट्रेनिंग दिले होते. यावेळी डॉक्टरांसोबत सिस्टर, वॉर्डबॉय यांनाही वेळेनुसार कर्तव्यावर ठेवले होते. तसेच प्रत्येक ग्राऊंडवर एक कार्डियाक रुग्णवाहिका, शासकीय रुग्णवाहिका अशा दोन रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या होत्या.

पोलीस मुख्यालय मरोळ, नायगाव, कलिना विद्यापीठ येथे भरती चाचणी घेण्यात आली. पहाटे साडेपाच वाजता सुरू होणारी चाचणी परीक्षा रात्री १० वाजेपर्यंत सुरुवातीला चालली होती. या प्रक्रियेत मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि सह आयुक्त एच जयकुमार यांनी जातीने लक्ष घातले, त्यामुळे प्रक्रिया सुरळीत पार पडली.

..तरीही तीन उमेदवारांचा मृत्यू

गेल्या भरतीवेळी झालेल्या मृत्यूचा विचार करून यंदा ५ किमी धावण्याच्या चाचणी ऐवजी १६०० मीटर धावण्याची चाचणी घेण्यात आली. त्याचबरोबर उन्हाचा तडाखा बसू नये, म्हणून धावपट्टीवर मंडप टाकण्यात आला होता. मात्र, एक युवक धावण्याची चाचणी पूर्ण करताच कोसळला, त्याला काही सेंकदात डॉक्टरांची मदत मिळाली, पण तो वाचू शकला नाही. तसेच एक जण चाचणी देऊन जिथे रहात होता, तिथे गेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला तर एकाचा चाचणी झाल्यानंतर कपडे घालत असताना मृत्यू झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news