सेटवर नाश्ता मिळाला नाही म्हणून या अभिनेत्याने सोडला होता हा सुपरहिट सिनेमा

milind soman
milind soman

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुपरफिट, फिटनेस फ्रिक हे शब्द ऐकले की कोणतं नाव आठवतं? तुमच्या आमच्या मनात या वर्णनावरून आलेल एकाच नाव म्हणजे मिलिंद सोमण. फिटनेस फ्रीक मिलिंद आजही कित्येक महिलांचा क्रश आहे. सुपर मॉडेल असलेला मिलिंद आजही त्याच्या लूक्स आणि फिटनेसमुळे चर्चेत असतो. वयाच्या ५० व्या वर्षी त्याने 'आर्यन मॅन' किताब आपल्या नावे केला किनाऱ्यावरच विवस्त्रावस्थेतील जॉगिंग असो किंवा वयाने बऱ्याच लहान असलेल्या अंकिता कोंवरसोबत लग्न . मिलिंद कायमच हटके कारणांनी चर्चेत राहिला आहे. मिलिंदने नुकताच त्याचा ५७ वा बर्थडे सेलिब्रेट केला.

पत्नी अंकितासोबत त्याने यावेळी वाढदिवसाचं सेलिब्रेशन केल. पण तुम्हाला माहिती आहे का, मिलिंदने एका सुपरहिट सिनेमाला केवळ सेटवर नाश्ता मिळाला नव्हता म्हणून त्याने सिनेमा सोडला होता. ही गोष्ट आहे 'जो जिता वोही सिकंदर' सिनेमा दरम्यानची. मन्सूर खान दिग्दर्शित या सिनेमात तो शेखर मल्होत्राच्या व्यक्तिरेखेत होता. ही भूमिकानंतर अभिनेता दीपक तिजोरी याला मिळाली.

मिलिंदने त्याच्या आत्मचरित्रात या घटनेचा उल्लेख केला आहे. हा सिनेमा तडकाफडकी सोडण्याच्या कारणाबाबत तो म्हणतो, 'मला सेटवर सकाळपासून नाश्ता मिळाला नव्हता. अशावेळी माझा राग अनावर झाला होता. त्यामुळे मी सायकल फेकली आणि निघून आलो. एखाद काम करताना त्या ठिकाणी पोषक वातावरण नसेल तर मला ते करणं अशक्य आहे.' असं म्हणत त्याने तो सिनेमा सोडला. अर्थातच हा सिनेमा सुपरहिट झाला. पण या घटनेचा मिलिंदला जराही पश्चाताप नसल्याचं त्याने मुलाखतीमध्ये सांगितलं.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news