पुणे : दहावीची परीक्षा उद्यापासून; पंधरा लाख विद्यार्थी देणार परीक्षा

फाईल फोटो
फाईल फोटो
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्य मंडळाकडून दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे. सलग तीन वर्षांपासून दहावीच्या विद्यार्थी संख्येत घट होत असून, यावर्षी गतववेळी पेक्षा ६१ हजार विद्यार्थी कमी झाले आहेत. यावर्षी २३ हजार १० शाळांतील १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी बुधवारी (दि.१) पत्रकार परिषदेत माहिती दिली. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर आदी या वेळी उपस्थित होते.

गोसावी म्हणाले, सीबीएससई, आयसीएसई आदी शाळा वाढणे, या वयोगटातील मुलांमध्ये घट अशा कारणामुळे ही विद्यार्थी संख्येत घट असू शकते. यंदा शंभर टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होईल. बारावीप्रमाणेच दहावीला वाढीव दहा मिनिटे मिळतील. पालक, विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमातील वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये. मंडळाने प्रसिद्ध केलेले अधिकृत वेळापत्रकच ग्राह्य धरावे. परीक्षा महत्त्वाची असली, तरी ती सर्वस्व नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अभ्यास करून दडपण न घेता परीक्षेला सामोरे जावे. विद्यार्थ्यांना परीक्षेचे नैराश्य येऊ नये म्हणून समुपदेशकांची नियुक्ती केली आहे, असे गोसावी यांनी सांगितले.

बारावीच्या इंग्रजी प्रश्नपत्रिकेतील चुकांबाबत मंडळाची दिलगिरी
इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत झालेल्या चुकांबाबत मंडळ दिलगीर आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक अशा घटकांमध्ये मंडळाच्या विश्वासार्हतेला बाधा येऊ शकते. मात्र विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. विद्यार्थ्यांना न्याय देण्याची दक्षता घेतली जाईल, असे गोसावी यांनी स्पष्ट केले

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news