पुढारी ऑनलाईन डेस्क : आज रिलीज झालेल्या 'जवान' ची चर्चा सर्वत्र सुरू आहेच. पण त्यासोबत चर्चा होते आहे ती आणखी एका सुपरस्टारची. तुमच्या मनात शाहरुखचं नाव आलं असेल तर थांबा. कारण या सुपरस्टारचं नाव आहे नयनतारा. शाहरुखसोबत जवानमध्ये बॉलीवुड डेब्यू करणाऱ्या नयनताराला लोक मात्र तामीळ सिनेमाची लेडी बच्चन म्हणतात. डायना मरियम कुरियन हे मूळ नाव असलेल्या नयनताराने करियरसाठी नाव आणि धर्म दोन्ही बदलला. कॉलेजच्या दिवसांत मॉडेलिंग करता करता तिला सिनेमाची ऑफर आली. मनसिनक्करे या सिनेमातून डेब्यू केला. यानंतर तामीळ सिनेमा 'अय्या' याशिवाय 2010 मध्ये तिने कन्नड सिनेमात डेब्यू केला. यात 'राजा रानी', नानुम 'राउडी धान' आणि'आराम' या सिनेमांचा समावेश होते.
लेडी सुपरस्टार बनण्याचा नयनताराचा प्रवास सोपा नव्हता. त्यावेळी नयनताराचं नाव प्रसिद्ध कोरिओग्राफर प्रभूदेवाशी जोडलं जात होतं. विशेष म्हणजे विवाहित प्रभूदेवाच्या प्रेमात नयनतारा आकंठ बुडाली होती. ही जोडी लग्नही करणार अशी चर्चा होती. पण कुठेतरी माशी शिंकली आणि हे लव्हबर्डस कायमसाठी वेगळे झाले. या दरम्यान करियरच्या पीकवर असलेली नयनतारा या ब्रेक अपने चांगलीच अस्वस्थ झाली होती. यातून सावरण्यासाठी तिने एक दोन नाही तर तब्बल 11 महिन्यांचा गॅप घेतला.
ब्रेक अपचं दु:ख मागे पडलं आणि २०१२ ला तिने 'कृष्णं वंदे जगद्गुरु' या सिनेमातून राणा दगगूबाटीसोबत कमबॅक केलं. यानंतर Naanum Rowdy, Thani Oruvan, Airaa , Imaikaa Nodigal , Aramm आणि Dora या सिनेमांनी तीची वेगळी आणि सशक्त अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली. नयनताराला पुथिया नियमम या सिनेमासाठी सर्वोत्तम मल्याळम अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यासोबतच तिने अनेक पुरस्कार आपल्या नावावर केले. या सिनेमांच्यानंतर तिला दक्षिणेतील अमिताभ म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
जवानमधून डेब्यू
कन्नड, तेलुगू आणि मल्याळम सिनेमा गाजवल्यानंतर नयनतारा आता जवानमधून बॉलीवूडमध्ये दिसते आहे.
हेही वाचा :