ठरलं तर मग टीमने सिद्धीविनायक मंदिरात घेतलं बाप्पांचं दर्शन

tharl tar team
tharl tar team

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिकेने नुकताच २०० भागांचा टप्पा पार केला. या निमित्ताने मुंबईतील सुप्रसिध्द सिद्धीविनायक मंदिरात ठरलं तर मग मालिकेच्या संपूर्ण टीमने बाप्पाचं दर्शन घेतलं. या खास प्रसंगी निर्माते सुचित्रा बांदेकर, सोहम बांदेकर आणि आदेश बांदेकर उपस्थित होते.

ठरलं तर मग मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग बनलं आहे. याच प्रेमापोटी सातत्याने नंबर वन रहाण्याचा मान ठरलं तर मग मालिकेला मिळाला आहे. प्रेक्षकांचं हे प्रेम आणि बाप्पाचा आशीर्वाद असाच पुढच्या प्रवासात मिळावा ही भावना संपूर्ण टीमने या खास प्रसंगी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news