पावसात ठाण्यात गोविंदांचा उत्साह कायम, सकाळपासून गोविंदा पथकांची हजेरी

फोटो - अनिशा शिंदे, ठाणे
फोटो - अनिशा शिंदे, ठाणे

ठाणे – पुढारी वृत्तसेवा – ठाणे शहरात पहाटेपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा गोविंदांच्या उत्साहावर परिणाम झाला नाही. सकाळी नऊ दहा पासूनच गोविंदा पथकांनी शहरातील विविध हंड्यांच्या ठिकाणी हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी पहाट पासून हजेरी लावली त्यामुळे गोविंदांच्या उत्साह उत्साहावर पावसाचे विरजण पडते की काय असे वाटत होते. मात्र ठाण्याबरोबरच मुंबईतील गोविंदा पथकांनी ठाण्यातील मोठ्या हंड्यांपुढे थर लावण्यासाठी हजेरी लावली. ठाण्यात यंदाही अकरा थरांचा विश्वविक्रम करण्याचा जय जवान, शिव साई, कोकण नगरच्या पथकांचा मानस आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृत संस्कृती प्रतिष्ठानच्या तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हंडी हंडीत हा विश्वविक्रम होण्याची शक्यता आहे. भगवती मैदाना वर होणाऱ्या मनसेच्या हंडीत यापूर्वी अध्यक्ष राज ठाकरे यांनी लावली नाही मात्र आजच्या हंडीत सायंकाळी सहाच्या सुमारास राज ठाकरे हजर राहणार आहेत त्यांच्यासमोरच थरांचा विश्व विक्रम रचला जाणार आहे.

शहरात शहरात सकाळी १० वाजेपासून ट्रक, खासगी बसेस आणि दुचाकीवर रंगीबेरंगी टी-शर्ट घातलेले गोविंदा पथके मुंबईतून आणि ठाण्याच्या विविध भागातून दाखल झाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news