पुढारी ऑनलाईन डेस्क : तरसांच्या हातात हत्ती सापडावा, अशी सध्या महाराष्ट्राची परिस्थिती आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोणत्याही पक्षाचे नाव घेता केली. ही टीका सर्व राजकीय लोकांना लागू होते, असेही ते म्हणाले. एका चित्रपटाच्या मुलाखतीवेळी ते बाेलत हाेते. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती कशी असावी, यावर त्यांनी यावेळी मत व्यक्त केलं. जर माझ्या हाती ही सत्ता आली तर जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र उभा करेन, अशी ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली. (Raj Thackeray)
सध्या जे चित्र दिसत आहे ते फक्त ओरबाडणे सुरु आहे. निवडणुकीसाठी पैसे लागतात का? असा खोचक सवाल करत त्यांनी राजकीय नेत्यांच्या खर्चावर टीका केली. सामान्य लोकांचे प्रश्न लक्षात घेणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
फारसी शब्द कसे असतात, हे सांगत असताना राज ठाकरे म्हणाले की, "काही शब्दांचे अर्थ हे खूप विस्तीर्ण असतात. चिटणीस म्हणजे चिठ्ठी लिहिणारा. फडणवीसमधील फड म्हणजे फळा, फळ्यावर लिहीणारा. असे काही शब्द असतात."
सरदार वल्लभभाईंचा पुतळा चायना मधून आणलेला आहे. या पुतळ्यांची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. एकीकडे आपण चीनला विरोध करतो आणि हे पुतळे का मग तिथून आणले. पुतळे उभारण्याची गरज आहे का? असं मत व्यक्त करत त्यांनी सध्या विकासावर भर दिली पाहीजे, असेही ते म्हणाले.
अंधेरी पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी फडणवीस यांना दिले आहे. ही निवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राकडून एक चांगला संदेश सर्वांना मिळेल. असं मत देखील त्यांनी व्यक्त केले. मुलाखत संपल्यानंतर माध्यमांशी बोलत असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा