Telangana Legislative Assembly Election: तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची तिसरी यादी जाहीर

BJP News
BJP News
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: भारतीय जनता पक्षाने तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी ३५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. बुधवारी संध्याकाळी उशिरा भाजपच्या राष्ट्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. यानंतर गुरुवारी ही यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या तिसऱ्या यादीत चल्ला श्रीलता रेड्डी या एकमेव महिला उमेदवाराच्या नावाचा समावेश आहे. (Telangana Legislative Assembly Election)

ज्युबिली हिल्स मतदारसंघातुन लंकला दीपक रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस उमेदवार मोहम्मद अझरुद्दीन यांच्याविरुद्ध ते निवडणूक लढवतील. भाजप नेते मर्री शशिधर रेड्डी यांना सनथनगर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच या यादीमध्ये ३ अनुसूचित जमाती आणि ४ अनुसूचित जातीच्या उमेदवारांचा समावेश आहे. (Telangana Legislative Assembly Election

यापूर्वी भाजपाने आपल्या पहिल्या यादीत ५२ उमेदवारांची घोषणा केली होती. तर दुसऱ्या यादीत केवळ एका उमेदवाराची घोषणा केली होती. त्यानंतर तिसऱ्या यादीत ३५ उमेदवारांची घोषणा केली आहे. एकूण ११९ विधानसभा सदस्य संख्या असलेल्या तेलंगना विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण ८८ उमेदवारांची घोषणा भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. तेलंगना राज्यात सत्तेत असलेला भारत राष्ट्र समिती पक्ष आणि काँग्रेस यांचे कडवे आव्हान या निवडणुकीत भाजप समोर असणार आहे. (Telangana Legislative Assembly Election)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news