प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.

Telangana Legislative Assembly Election : तेलंगणा निवडणुकीसाठी भाजपची चौथी यादी जाहीर

Published on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Telangana Legislative Assembly Election : तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 12 उमेदवारांची आणखी एक यादी मंगळवारी (7 नोव्हेंबर) जाहीर केली. यामध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव मतदरसंघांपैकी चेन्नुरमधून दुर्गम अशोक, विकराबाद येथून पेत्रिणी नवीन कुमार, नकरेकाल नकारकांती मोगुलैया, तर अनुसूचित जमाती अजमीरा प्रल्हाद नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तुला उमा या एकमेव महिला उमेदवाराचा समावेश आहे. तर व्ही सुभाष रेड्डी आणि चालमला कृष्णा रेड्डी यांना देखील भाजपने तिकीट दिले असून ते नुकतेच काँग्रेसमधून भाजपात दाखल झाले आहेत.

यापूर्वी 2 नोव्हेंबर रोजी भाजपने तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी 36 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. या 12 उमेदवारांसह आता एकूण उमेदवारांची संख्या 100च्या वर झाली असून यात 14 महिला उमेदवारांचा समावेश आहे. (Telangana Legislative Assembly Election)

तेलंगणामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 30 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. यावेळी तेलंगणातील सत्ताविरोधी लाटेमुळे भारत राष्ट्र समिती आणि इतर पक्षात कडवी लढत अपेक्षित आहे. हे लक्षात घेऊन काँग्रेस आणि भाजपने येथे आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. दरम्यान, तेलगू अभिनेते व 'जनसेना' पार्टीचे प्रमुख पवन कल्याण यांनी भाजपला साथ दिली आहे. येथील निवडणुकीचा निकाल इतर 4 राज्यांच्या बरोबर 3 डिसेंबर रोजी लागणार आहे. (Telangana Legislative Assembly Election)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news