Telangana Elections 2023 : तेलंगणात ६५ टक्क्यांवर उत्स्फूर्त मतदान

Telangana Elections 2023 : तेलंगणात ६५ टक्क्यांवर उत्स्फूर्त मतदान

तेलंगणा; वृत्तसंस्था : तेलंगणात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 65 टक्क्यांवर मतदान झाले. अखेरची आकडेवारी रात्री उशिरा जाहीर होईल.
तत्पूर्वी, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) अध्यक्ष के.चंद्रशेखर राव यांनी विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र, यावेळी त्यांच्यासमोर भाजप आणि काँग्रेसचे तगडे आव्हान असल्यामुळे रविवारी निकालानंतरच सत्तेबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. (Telangana Elections 2023)

राव यांनी कल्याणकारी योजनांवर सर्व लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील मतदारांना विक्रमी मतदान करण्याचे आवाहन केले. लोकशाहीच्या या उत्सवात नव्या मतदारांसह सर्वांनी सहभागी व्हावे, असे मोदी यांनी एक्सवरून म्हटले आहे.

तेलंगणाची 2014 साली स्थापना झाली. राव अर्थात केसीआर हे तेलंगण राज्याचे संस्थापक मानले जातात. तेव्हापासून त्यांनी दोन वेळा विधानसभा निवणूक जिंकली आहे. कामारेड्डी आणि गजवेल या दोन मतदारसंघातून ते भाजप आणि काँग्रेस उमेदवाराविरोधात निवडणुकीत उभे राहिले आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम या राज्यांच्या निवडणुका पार पडल्या असून तेलंगणातील मतदान गुरुवारी पार पडले. मिनी लोकसभा म्हणून ओळखल्या जाणार्‍या या पाच राज्यांचा निकाल रविवारी लागणार आहे. भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवनाथ रेड्डी यांच्या बंधूस मतदार केंद्रावर जाण्यास मज्जाव केल्याने तणाव निर्माण झाला. (Telangana Elections 2023)

तेलंगणातील 119 जागांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू आहे. रेड्डी यांचे बंधू तीन गाड्यांमधून 20 समर्थकांना सोबत घेऊन मतदारसंघात जाऊन दबाव टाकत असल्याचा आरोप बीआरएसने केला. दरम्यान, पोलिसांनी काहीजणांना अटक केली आहे. मतदानाच्या रांगेत उभे राहिल्याने दोघांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. दोन-तीन मतदारसंघांत बीआरएस आणि काँग्रेस आणि बीआरएस आणि भाजप कार्यकर्त्यांत वादावादी झाल्याचे पाहावयास मिळाले. काही ठिकाणी पोलिसांनी लाठीहल्ला केल्याने जमाव पांगला. (Telangana Elections 2023)

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news