Telangana Election Result Live Updates : तेलंगणात काँग्रेसचा बहुमताचा आकडा पार, ६४ जागांवर आघाडी

Telangana Election Result Live Updates : तेलंगणात काँग्रेसचा बहुमताचा आकडा पार, ६४ जागांवर आघाडी

पुढारी ऑनलाईन डेस्क : २०१४ मध्ये स्थापना झाल्यापासून भारत राष्ट्र समिती (BRS) चा बालेकिल्ला असलेला तेलंगणामध्ये काँग्रेसने बीआरएसला चारी मुंड्या चीत केलं आहे. के चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला असून काँग्रेसचा विजय उंबरठ्यावर आहे. तेलंगणा काँग्रेसचे फायरब्रँड अध्यक्ष अनुमुला रेवंत रेड्डी यांच्या धोरणात्मक नेतृत्वाने काँग्रेस तेलंगणात ऐतिहासिक विजय मिळवत आहे.

तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. काँग्रेसने ६४ जागांवर आघाडी घेतली असून बीआरएस ४० जागांसह पिछाडीवर आहे. ११९ सदस्यीय तेलंगणा विधानसभेसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. निवडणूक लढविणाऱ्या २ हजार २९० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे.  (Telangana Election Result Live)

Telangana Election Result 2023, Live Updates :

  • काँग्रेसची ६४ जागांवर आघाडी, बीआरएस ४०, भाजप ८, एआयएमआयएम ६, इतर १ 
  • कोडंगलमधून रेवंत रेड्डी विजयी

TPCC अध्यक्ष ए रेवंत रेड्डी कोडंगलमधून विजयी

  • काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्या पोस्टरला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून दुग्धाभिषेक करण्यात आला.
  • काँग्रेसची ६७ जागांवर आघाडी

काँग्रेस ६७ जागांवर आघाडीवर, बीआरएस ३६, भाजप ८, एआयएमआयएम ३, इतर १

  • ज्युबली हिल्समध्ये मोहम्मद अझरुद्दीन आघाडीवर आहे

माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद अझरुद्दीन ज्युबली हिल्समध्ये बीआरएस उमेदवाराविरुद्ध कमी फरकाने आघाडीवर आहेत.

  • काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला, ६२ जागांवर आघाडी
    काँग्रेस ६२, BRS ४४, भाजपा ८, AIMIM ४, इतर १
  • माजी उपमुख्यमंत्री दामोदर राजनरसिम्हा आंदोळेमध्ये आघाडीवर
    आंदोळेमध्ये काँग्रेसचे उमेदवार आणि माजी उपमुख्यमंत्री दामोदर राजनरसिंह हे प्रतिस्पर्धी बीआरएसच्या चक्रांती किरण यांच्यावर ३,४६५ मतांनी आघाडीवर आहेत.
  • तेलंगणात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
    हैदराबादमध्ये रेवंत रेड्डी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेस समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला. सध्याच्या कलानुसार, काँग्रेस ५१ जागांवर, बीआरएस २९ जागांवर आणि भाजप ६ जागांवर आघाडीवर आहे.
  • काँग्रेस ४४ जागांवर आघाडीवर

ECI ट्रेंडनुसार, काँग्रेस ४४, बीआरएस २४, आणि भाजप ३ जागांवर आघाडीवर आहे.

  • सोशल मीडिया सेन्सेशन बॅरेलक्का कोल्लापूरमध्ये पिछाडीवरकोल्लापूरमध्ये अपक्ष उमेदवार आणि सोशल मीडियावर खळबळ माजवणाऱ्या बॅरेलक्का पिछाडीवर आहेत. पहिल्या फेरीत त्यांना ४७३ मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार जुपल्ली कृष्ण राव आघाडीवर आहेत.
  • आतापर्यंतच्या कलानुसार काँग्रेस ३१ जागांवर तर बीआरएस २० जागांवर आघाडीवर आहे. 
  • के कविता (BRS MLC K Kavitha) या हैदराबादमधील त्यांच्या निवासस्थानातून सीएम कॅम्प ऑफिसकडे रवाना झाल्या आहेत.
  • तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांचे समर्थक त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानाबाहेर जमा झाले आहेत.
  • पहिल्या फेरीच्या मतमोजणीत काँग्रेसची आघाडी कायम आहे. ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात झाली असून काँग्रेसची आघाडी कायम आहे.
  • सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेस बीआरएसच्या पुढे
  • तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे.

तेलंगणामध्ये काँग्रेसच्या घोषणा पत्रातील प्रमुख मुद्दे :

सत्तेत आल्यास महिलांना अडीच हजार रुपये प्रति महिना देण्यात येईल. पाचशे रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देण्यात येईल. प्रत्येक घरात २०० युनिट वीज मोफत देण्यात येईल. प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना १५ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येईल. शेतीत काम करणाऱ्या मजुरांना 12 हजार रुपये देण्यात येतील. पात्र लाभार्थ्यांना दहा लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्यात येईल.

तेलंगणामध्ये बीआरएसच्या घोषणा पत्रातील प्रमुख मुद्दे :

पाच लाख रुपयांचा विमा देण्यात येईल. प्रत्येक परिवाराला दहा लाख रुपये अनुदानाची 'दलित बंधू' योजना सुरुवात करण्यात येईल. ९३ लाख परिवारांना जीवन विमा देण्यात येईल. हैदराबादमध्ये एक लाख घर बनवण्यात येतील. आसरा पेन्शनची रक्कम वाढवून ३ हजार करण्यात येईल. जुन्या पेन्शन योजनेचा अभ्यास करण्यात येईल.

तेलंगणामध्ये भाजपच्या घोषणा पत्रातील प्रमुख मुद्दे :

पेट्रोल, डिझेल वरील व्हॅट कमी करण्यात येईल. उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक चार गॅस सिलेंडर मोफत देण्यात येतील. छोट्या शेतकऱ्यांना बी बियाणे घेण्यासाठी मदत अडीच हजार रुपये मदत करण्यात येईल. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्यात येतील. जन्मतः मुलीला दोन लाख रुपये देण्यात येतील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news