Sonia Gandhi : सोनिया गांधींना तेलंगणातून ‘लोकसभा’ लढवणार?

Sonia Gandhi : सोनिया गांधींना तेलंगणातून ‘लोकसभा’ लढवणार?

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी यांनी सोमवारी सोनिया गांधींची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पुन्हा एकदा सोनिया गांधींना तेलंगणातून लोकसभा निवडणूक लढविण्याचे आवाहन केल्याचे समजते. सोनिया गांधींना भेटण्यापूर्वी रेड्डी यांनी रांचीमध्ये भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांची भेट घेतली होती.

तेलंगणाला राज्याचा दर्जा सोनिया गांधींनी मिळवून दिला. त्यामुळे तेलंगणातील जनता त्यांना आईच्या रूपात बघते. तेलंगणा काँग्रेसनेही सोनिया गांधींनी तेलंगणातून लोकसभा निवडणूक लढवावी, असा ठरावही मंजूर केल्याचे रेड्डी यांनी सांगितले. आणि पुन्हा एकदा सोनिया गांधींनी तेलंगणातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे आवाहन रेवंथ रेड्डी यांनी भेटीदरम्यान केले. त्यावर सोनिया गांधींनी मात्र योग्य वेळ आल्यावर निर्णय घेणार असल्याचे सांगितले. याच भेटीत रेड्डी यांनी तेलंगणा विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी केल्याची माहिती दिली.

सोनिया गांधींच्या भेटीपूर्वी भारत जोडो न्याय यात्रा झारखंडमधील रांचीत असताना रेवंथ रेड्डी यांनी राहुल गांधींचीही भेट घेतली. दोन्ही भेटीदरम्यान रेवंथ रेड्डींसह उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमादित्य आणि मंत्री पोंगुलेती श्रीनिवास रेड्डी हेदेखील होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news