मुंबई; पुढारी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून प्रहार करत असलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज मुंबई दौऱ्यावर आहेत. केसीआर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी भेट घेऊन चर्चा करणार आहेत.
टीआरएसने दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केसीआर आणि त्यांच्या टीमला डिनरसाठी आमंत्रित केले आहे. या बैठकीत राष्ट्रीय मुद्यांवर चर्चा केली जाणार असल्याचेही समोर आले आहे.
यापूर्वी, केसीआर यांनी भाजपवर कडाडून हल्लाबोल केला होता. भाजपला देशातून हद्दपार बंगालच्या उपसागरात बुडवले पाहिजे अन्यथा देश उद्धस्त होईल असे म्हटले होते. केसीआर या भेटीनंतर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेण्याच्या तयारीत आहेत.
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही मुंबई दौरा करून दोन्ही नेत्यांशी चर्चा केली होती. भाजपविरोधी पक्षांची देशव्यापी मोट बांधण्यासाठी आता केसीआर यांनीही पुढाकार घेतला आहे. त्याच रणनीतीचा भाग म्हणून केसीआर यांची ही भेट पाहिली जात आहे.
मोदी सरकार तेलगंणाला पुरेसा निधी देत नसल्याचा आरोप केला आहे. तुलनेत आंध्राला झुकते माप मिळत असल्याने त्यांचा राग आणखी वाढला आहे. राज्यातील जलसिंचन तसेच पायाभूत सुविधा प्रकल्पांना केंद्रीय अर्थसंकल्पात कोणीही तरतूद करण्यात आलेली नाही. केंद्राकडे केसीआर सरकारने एक लाख कोटीच्या कालेश्वरम प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता द्यावी म्हणून मागणी केली होती, पण त्याकडेही दुर्लक्ष झाले.
हे ही वाचलं का ?