Tejashri Pradhan : तेजश्रीची ‘ती’ पोस्ट व्हायरल, तब्बल अडीच वर्षानंतर…

Tejashri Pradhan
Tejashri Pradhan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कधी लक्ष्मी तर कधी जान्हवी तर कधी शुभ्रा आणि मुक्ता यासारख्या दमदार भूमिका साकारणारी तेजश्री प्रधान परतलीय. तब्बल अडीच वर्षानंतर टीव्ही मालिकेत तेजश्री प्रधान परतलीय. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून ही माहिती दिलीय. (Tejashri Pradhan) तिने मोठी पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे- कसे आणि कुठल्या शब्दात आभार मानू? तब्बल अडीच वर्षानंतर television वर पुन्हा परतल्ये.. तुमच्यातलं कोणीतरी अचानक समोर येतं आणि पटकन म्हणतं "आम्हाला तू आमच्या घरातलीचं वाटतेस tv मधे पाहिल्यावर" … तेचं आपलं घरातलं माणूस अडीचं वर्षानंतर परत यावं, आपण त्याच्या गेल्या दिवसापासून परत येण्याच्या वाटेवर डोळे ठेवून रहावं, आणि घरी परतलेल्या "त्या" माणसाला तुमचे ते वाट पाहणारे डोळे पाहून भरूनचं यावं….तसचं काहीस माझ्या मनाचं झालयं , आज पहिल्या भागाला (episode ला) तुम्ही दिलेला प्रतिसाद कळल्यानंतर? (Tejashri Pradhan)

इतकी वर्ष कामावर श्रद्धा ठेवून सातत्याने तुमच्या समोर येत राहीले.. पडले, धडपडले, पुन्हा उठले .. आधाराला फक्त काम होतं… शाश्वत फक्त काम होतं , इतकी वर्ष त्याच कामाने मला घट्ट धरून ठेवलं आणि त्या कामाला तुम्ही. आज हे असं व्यक्त होण्याचा उद्देश इतकाचं… सांगावसं वाटलं, "मला जाणीव आहे तुमच्या आयुष्यातल्या 'त्या' अर्ध्या तासाची, जो तुम्ही माझ्या नावावर करता, जाणीव आहे त्या प्रेमाची, त्या आत्मियतेची आणि नकळत तुमच्या डोळ्यातून कधीतरी येणाऱ्या 'त्या' अश्रुच्या थेंबाची.. जो कधी लक्ष्मी सीठी, कधी जान्हवी साठी, कधी शुभ्रासाठी आणि आता मुक्ता साठी ढळतो.. " आणि हिचं जाणीव सातत्याने पोटतिडकीने काम करण्याचं आणि त्या कामाशी एकनिष्ठ राहण्याचं बळ देत आली आहे , या पुढे ही देत राहील?

पुन्हा एकदा … मनापासून आभार असेचं कायम माझ्या पाठीशी रहा. बाकी #HappyLife आहेचं. तेजश्री प्रधान स्टार प्रवाहवरील प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत भूमिका साकारतेय. मालिकेचं नाव आहे प्रेमाची गोष्ट. स्टार प्रवाहच्या प्रत्येक मालिकेतून नातेसंबंधांवर भाष्य केलं जातं. प्रेमाची गोष्ट ही मालिकादेखील नात्यांची गुंफण असेल. चिमुकल्या सईवरच्या प्रेमापोटी दोन विभिन्न स्वभावाचे मुक्ता आणि सागर कसे एकत्र येतात आणि त्यांच्यातलं प्रेम कसं बहरत जातं हे सांगणारी सुंदर, तरल कथा म्हणजे प्रेमाची गोष्ट.
अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मुक्ता गोखले नावाचे पात्र साकारतेय. राज हंचनाळे सागर कोळीच्या भूमिकेत आहे. यासोबतच शुभांगी गोखले, संजीवनी जाधव, अपूर्वा नेमळेकर, संजय शेजवळ, योगेश केळकर, उमेश घाडगे, सुप्रीत कदम आणि बालकलाकार इरा पारवडे अशी दिग्गज कलाकारांची फौज मालिकेत आहे. राहुल लिंगायत या मालिकेचं दिग्दर्शन करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news