Team India : डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी टीम इंडियाचा स्टार फलंदाज जखमी

Team India : डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी टीम इंडियाचा स्टार फलंदाज जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी (WTC Final) टीम इंडियासाठी (Team India) इंग्लंडमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. ओव्हल मैदानावर सराव करताना सलामीवीर इशान किशनला (Ishan Kishan) दुखापत झाली आहे. दरम्यान, 7 जूनपासून सुरू होणा-या डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात इशान खेळेल की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे आहे. या विजेतेपदाच्या लढतीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी (Ind vs Aus) होणार आहे.

इशान किशन जखमी

वास्तविक, इशान किशनला (Ishan Kishan) ही दुखापत फलंदाजीच्या सराव दरम्यान झाली. नेट सेशनमध्ये चेंडू थेट त्याच्या उजव्या हातावर आदळला. त्यानंतर तिव्र वेदना होत असल्याने तो काही वेळ हात धरून बसला. त्यानंतर वैद्यकीय पथकाने त्याच्यावर तत्काळ प्रथमोपचार केले. दरम्यान, तिव्र वेदना होत असल्याने भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाला पाहून पुढील सरावात भाग घेता येणार नाही, असे वाटत होते. मात्र, काही वेळाने इशान पुन्हा हातावर पट्टी बांधून फलंदाजी करताना दिसला, त्यानंतर संपूर्ण भारतीय शिबिराने सुटकेचा नि:श्वास सोडला. (Team India)

इशान की केएस भरत.. कोणाला मिळणार संधी?

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम सामन्यात इशान किशन (Ishan Kishan) किंवा केएस भरत (KS Bharat) यांना संधी मिळेल. केएस भरत दीर्घकाळापासून भारतीय कसोटी संघाचा भाग आहे आणि तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्येही खेळला होता. मात्र, इशान त्याच्या फलंदाजीच्या क्षमतेमुळे डब्ल्यूटीसी फायनलमध्ये मॅच विनर ठरू शकतो, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. (Team India)

IPL 2023 मध्ये ईशानची कामगिरी नेत्रदीपक

IPL 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना इशान किशनची कामगिरी नेत्रदीपक होती. इशानने इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामात खेळल्या गेलेल्या 16 सामन्यांमध्ये 142 च्या जोरदार स्ट्राइक रेटने 454 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून तीन अर्धशतक झळकली. मात्र, असे असतानाही मुंबई इंडियन्सच्या संघाला दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.

केएस भारताला सुवर्ण संधी

भारतीय संघाने सलग दुस-यांदा डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी गाठली आहे. गेल्या वेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाला अंतिम फेरीत न्यूझीलंडकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण यंदा मात्र, रोहित सेना ऑस्ट्रेलियाला मात देऊन डब्ल्यूटीसीची गदा उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.

आणखी वाच :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news