पुलवामामध्ये टार्गेट किलिंग, काश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या

पुलवामामध्ये टार्गेट किलिंग, काश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या

Published on

पुढारी ऑनलाईन : पुलवामामध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंग घडवून आणले आहे. बँक सुरक्षा रक्षक, काश्मिरी पंडित संजय शर्मा यांच्यावर हल्ला करून त्यांना दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पळून गेले. ही घटना आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. पंडित शर्मा यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याआधी शुक्रवारी (दि.२४) अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी माजी पंचांना लक्ष्य केले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उमर अब्दुल्ला यांच्याकडून हल्ल्याचा निषेध

या हल्ल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला म्हणाले की, दक्षिण काश्मीरमधील पुलवामातील अचन येथील संजय पंडित यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. संजय बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. आज सकाळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. मी या हल्ल्याचा निःसंदिग्धपणे निषेध करतो आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करतो.

मेहबुबा मुफ्तींचा केंद्रावर निशाणा

या प्रकरणावर पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, या घटनांचा फायदा भाजपलाच होतो, मग ती हरियाणा असो वा काश्मीर. येथील अल्पसंख्याकांच्या जीवाचे रक्षण करण्यात भाजपला अपयश आले. खोऱ्यातील सामान्य परिस्थिती दाखवण्यासाठी ते फक्त अल्पसंख्याकांचा वापर करतात. देशातील मुस्लिमांची प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजप अशा घटना घडवत आहे. मी या कृत्याचा निषेध करते. हे काश्मिरी लोकांचे वर्तन नाही. या सर्व कृतीतून सरकारचे अपयश दिसून येते.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news