Lust Stories 2 : तमन्ना भाटियासह नव्या कलाकारांसोबत भेटीला येतेय लस्ट स्टोरीज २ (Teaser)

lust stories 2
lust stories 2

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'लस्ट स्टोरीज' परत भेटीला येतेय. नवी कहाणी आणि ग्रँड न्यू कास्टसह 'लस्ट स्टोरीज २' चा (Lust Stories 2 ) टीझर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये काजोल, नीना गुप्ता, तमन्ना भाटिया, विजय वर्मा, आणि मृणाल ठाकुरसह अनेक स्टार्स आहेत. ही सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात येत आहे. (Lust Stories 2 )

२०१८ ला याचा पहिला भाग रिलीज झाला होता. यामध्ये चार डायरेक्टर्सची कहाणी दाखवण्यात आली होती. अनुराग कश्यप, जोया अख्तर, दिबाकर बॅनर्जी आणि करण जौहर. ही २०१३ ची अँथोलॉजी मुव्ही 'बॉम्बे टॉकीज'च्या कॉन्सेप्टवर बेस्ड होती. यामध्ये राधिका आपटे, भूमी पेडनेकर, मनीषा कोईराला, कियारा आडवाणी यांच्या भूमिका होत्या. सोबतच आकाश ठोसर, विक्की कौशल, नेहा धूपियासहित अन्य स्टार्सदेखील होते.

lust stories 2
lust stories 2

'लस्ट स्टोरीज २' मध्ये हे असणार कलाकार

लस्ट स्टोरीजच्या दुसऱ्या भागात देखील चार डायरेक्टर्सची कहाणी दाखवण्यात येईल. अमित रविंद्रनाथ शर्मा, कोंकणा सेन शर्मा, आर बाल्की, सुजॉय घोष हे चार डायरेक्टर्स असतील. अमृता सुभाष, अंगद बेदी, काजोल, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकुर, नीना गुप्ता, तमन्ना भाटिया, तिलोत्तमा शोम आणि विजय वर्मा यांच्या प्रमुख भूमिका असतील. लस्ट स्टोरीज २ नेटफ्लिक्सवर २९ जून, २०२३ रोजी पाहू शकाल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news