Taiwan Earthquake: तैवान हादरले; ६.३ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के

file photo
file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क: तैवान पुन्हा एकदा भूकंपाने हादरले आहे. दक्षिण चीन समुद्रात वसलेल्या तैवान या छोट्या बेटावर आज (दि.२४) पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे, अशी माहिती जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइन्सेसने (GFZ) दिली आहे, असे वृत्त 'रॉयटर्स' ने दिले आहे. (Taiwan Earthquake)

तैवानमध्ये झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदून १६.५ किमी खोलीवर आणि तैवानच्या ताईतुंग काऊंटीपासून समुद्रात होते, असे संबंधित जर्मन रिसर्च सेंटरने स्पष्ट केले आहे. भूकंपाच्या या धक्क्याने रहिवाशांना त्यांची घरे सोडून पळून जाण्यास प्रवृत्त केले. मात्र या नैसर्गिक आपत्तीमुळे अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही, असे देखील रॉर्यटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. या भूकंपाचे धक्के मात्र तैवानची राजधानी तैपेईमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले नाहीत. (Taiwan Earthquake)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news