Crew Box Office Collection : तब्बू, करिना कपूर, क्रितीच्या ‘क्रू’ दोन दिवसांत १८ कोटींच्या घरात

Crew Box Office Collection
Crew Box Office Collection

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक वर्षांनी तीन बड्या अभिनेत्री एकत्र असलेला एक नायिकाप्रधान चित्रपट आला आहे. तब्बू, करिना कपूर व क्रिती सेनॉन या अभिनेत्री मुख्य भूमिकेत असलेला 'क्रू' चित्रपट शुक्रवारी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने ग्रँड ओपनिंग केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी जबरदस्त कमाई केली. तर दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने भरघोष अशी कामगिरी केली आहे. ( Crew Box Office Collection )

संबंधित बातम्या 

हा 2024 मधील सर्वाधिक ओपनिंग करणार्‍या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच करिना, तब्बू व क्रिती एकत्रित आल्या आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

'सॅकनिल्क'च्या वृत्तानुसार, 'क्रू'ने शुक्रवारी पहिल्या दिवशी भारतात ८.७५ कोटी रुपये कमावले आहेत, तर जगभरात या चित्रपटाने २०.०७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

तर दुसऱ्या दिवशी दुस-या दिवशी, शनिवारी (दि. ३० मार्च ) रोजी देशात बॉक्स ऑफिसवर ९.६ कोटींचा गल्ला जमवला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीच्या कमाईचे एकूण कलेक्शन १८. ८५ कोटीवर पोहोचले आहे. जगभरात या चित्रपटाने ८ कोटी रुपयांची कमाई करत एकूण २८ कोटींच्या घरात पोहोचली आहे. तसेच वीकेंडचा रविवार आणि सुट्ट्या असल्याने या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

'क्रू'चे दिग्दर्शन राजेश कृष्णन यांनी केले आहे आणि त्यात कपिल शर्मा, दिलजित दोसांझ, सास्वता चॅटर्जी आणि राजेश शर्मा यांच्याही भूमिका आहेत. हा विनोदी चित्रपट पहिल्या दिवशी चांगली कमाई करण्यात यशस्वी ठरला आहे. चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अजय देवगणच्या 'शैतान'शी टक्कर होत आहे; पण या चित्रपटाला तीन आठवडे झाले आहेत. याशिवाय दुसरा कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही, त्याचा फायदा या चित्रपटाला मिळू शकतो. ( Crew Box Office Collection )

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news