Taapsee Pannu : तापसी पन्नू ‘या’ बॅडमिंटन खेळाडूसोबत करणार लग्न?

Taapsee Pannu
Taapsee Pannu

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. रिपोर्टनुसार, तापसी पन्न आपला लॉन्ग टाईम बॉयफ्रेंड Mathias Boe शी लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. (Taapsee Pannu) शीख आणि ख्रिश्चन पद्धतीने हा विवाह होणार आहे. दोघे जण एकेमकांना मागील १० वर्षांपासून डेट करत आहेत. रिपोर्टनुसार, आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. (Taapsee Pannu)

असे म्हटले जाते की, हा विवाह सोहळा उदयपूरमध्ये होणार आहे. तापसीने आपले नाते सुरुवातीला लाईमलाईटपासून दूर ठेवले होते. त्यांचे शाही लग्न इंटिमेट सेरेमनी असेल. केवळ कुटुंबीय आणि जवळचे मित्र या सोहळ्यात सहभागी होतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

तापसी म्हणाली, मी कधीच माझ्या खासगी जीवनाबद्दल सांगितलेले नाही आणि कधी सांगणारही नाही. जानेवारी, २०२४ मध्ये एका पॉडकास्टमध्यो बोलताना तापसी पन्नू म्हणाली होती-बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप करण्याचा कोणताही उद्देश नाही, कारण, ती या नात्यात खूप खुश आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

तापसीने जेव्हा बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता, तेव्हा ती आपल्या बॉयफ्रेंडला भेटली होती. तेव्हापासून ते नात्यात आहेत. तापसी म्हणते की, जर तुमचं नातं चांगलं आहे तर कोणतंही ओझं वाटत नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

जुलै २०२३ मध्ये तापसीने लग्नाबद्दल सांगितले होते की, 'मी प्रेग्नेंच नाही, तर आता लग्न करणार नाही. जेव्हा लग्न करेन, तुम्हाला नक्की सांगेन.'

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news