पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नूने लग्न केले आहे. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, तिने नुकताच उदयपूरमध्ये बॉयफ्रेंड मॅथियास बोए सोबत लग्न केले. हे लग्न शनिवार, २३ जानेवारी रोजी होणार असल्याचे म्हटले जात आहे. या लग्न समारंभात कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांना बोलावण्यात होतं. यामध्ये अनुराग कश्यप आणि पावेल गुलाटी सहभागी होते. (Tapasee Pannu) रिपोर्टनुसार, 'लग्न उदयपूरमध्ये खूप खासगी ठेवण्यात आलं. लग्नाआधी प्री-वेडिंग सेरेमनी देखील झाली, याची सुरुवात २० मार्चला झाली होती. रिपोर्टनुासर, कपलने आपले लग्न खूप खास आणि प्रायव्हेट ठेवलं. त्यांना कोणतेही मीडिया कव्हरेज अथवा गोंधळ नको होता. म्हणून त्यांनी खूप खासगी आणि खास लोकांसोबत हा दिवस सेलिब्रेट करण्याचा निर्णय घेतला. (Tapasee Pannu)
रिपोर्टमध्ये पुढे म्हटले आहे- या इव्हेंटमध्ये खूप अधिक बॉलीवूड सेलिब्रिटीज दिसले नाहीत. ती शाहरुख खानसोबत 'डंकी' मध्ये दिसली होती. तापसीने आपल्या लग्नात दिग्दर्शक अनुराग कश्यपला बोलावलं होतं. याशिवाय 'थप्पड' मधील तिचा सहकलाकार पावेल गुलाटीदेखील पाहुण्यांसोबत सहभागी होते. अनुराग कश्यप – तापसी चांगले मित्र आहेत. दोघांनी सोबत 'मनमर्जिया', 'दोबारा' आणि 'सांड की आंख' यासारखे चित्रपट केले आहेत. या लग्नात कनिका ढिल्लों आणि तिचा पती हिमांशु शर्मा देखील सहभागी झाले होते.
पावेल गुलाटीने लग्नाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, यामध्ये स्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेता अभिलाष थपियाल देखील दिसणार आहे. लग्नानंतर तापसी लवकरच मुंबईमध्ये एक पार्टी देईल. अपेक्षा आहे की, ती लग्नाची रिसेप्शन पार्टीची तारीख लवकरच घोषित करेल. तापसीच्या लग्नाची झलक शेअर करत पावेल गुलाटीने सोशल मीडियावर लिहिलं, 'ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, आम्हाला माहिती नाही की आम्ही कुठे आहोत!'