![T20 WC: अफगाणिस्तान-आयर्लंड पाठोपाठ इंग्लंड-ऑस्ट्रेलिया सामना रद्द!](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F10%2Faus-vs.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मेलबर्न, पुढारी ऑनलाईन : T20 WC : टी-20 वर्ल्डकपममध्ये (T20 World Cup 2022) आजचा (दि.28) दिवस पावसामुळे खराब गेला. अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड आणि त्यानंतर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामने पावसामुळे रद्द करण्यात आले. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना मेलबर्न मैदानावर खेळला जाणार होता. पण पावसामुळे टॉस न होताच हा सामना रद्द करण्याचा निर्णय पंच आणि सामनाधिकारी यांनी घेतला.
मेलबर्नमधील संततधार पावसामुळे टी 20 वर्ल्डकपमधील अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड यांच्यातील सामना सकाळी 9.30 वाजता नियोजित होता. पण ग्रुप 1 मधील हा सामना रद्द करण्यात आला. पावसामुळे या सामन्याचा टॉसदेखील झाला नाही. पावसामुळे हा सामना रद्द झाल्याने याच मेलबर्न मैदानावर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुपारी 1.30 वाजता होणाऱ्या नियोजित सामन्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अखेर पावसामुळे मैदान खूपच ओले असल्याने सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही संघांना एक-एक गुण बहाल करण्यात आला. याचबरोबर ग्रुप-2 मध्ये अव्वल स्थानी न्यूझीलंड (रन रेट +4.450), दुस-या स्थानी इंग्लंड (+0.239), तिस-या स्थानी आयर्लंड (-1.169), चौथ्या स्थानी ऑस्ट्रेलिया (-1.555), पाचव्या स्थानी श्रीलंका (+0.450), सहाव्या स्थानी अफगाणिस्तान (-0.620) आहेत. (T20 WC)
आज शुक्रवारी (दि.28) अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यातील सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर सकाळी 9.30 वाजता सुरु होणार होता. पण पावसामुळे हा सामना लांबत गेला. पाऊस न थांबल्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण मिळाला आहे. नियमानुसार पाच-पाच षटकांचा सामना खेळवण्याची निर्धारीत वेळ 11.45 पर्यंत होती. पण तरीही या वेळेत पाऊस न थांबल्यामुळे सामना रद्द केला आहे. ग्रुप 1 मध्ये आयर्लंड 3 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. आयर्लंडने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. तर अफगाणिस्तान सहाव्या स्थानावर कायम आहे. (T20 WC)