Shahid Afridi admires suryakumar : आफ्रिदीही झाला सूर्यकुमारचा फॅन; म्‍हणाला, “त्‍याची रिझवानबरोबर तुलना…”

Shahid Afridi admires suryakumar : आफ्रिदीही झाला सूर्यकुमारचा फॅन; म्‍हणाला, “त्‍याची रिझवानबरोबर तुलना…”
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेतील उत्‍कृष्‍ट कामगिरीमुळे टीम इंडियाचा स्‍टार फ्‍लेअर सूर्यकुमार याचे पाकिस्‍तानचे माजी वेगवान गाोलंदाज वसीम अक्रम आणि वकार यूनुस फॅन झाले आहेत. आता यामध्‍ये आणखी एका पाकिस्‍तानच्‍या माजी क्रिकेटपटूची भर पडली आहे. ( Shahid Afridi admires suryakumar ) पाकिस्‍तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीही सूर्यकुमारचा फॅन झाला असून, त्‍याने त्‍याच्‍या खेळीवर मो‍‍ठे विधान केले आहे.

टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेतील उत्‍कृष्‍ट कामगिरीमुळे जगभरातील चाहते सूर्यकुमारच्‍या फलंदाजीचे चाहते झाले आहेत.
यंदाच्‍या टी -२० विश्‍वचषक स्‍पर्धेत सूर्यकुमार केलेल्‍या कामगिरीमुळे चाहते त्‍याला 'मिस्टर 360' असेही संबोधित आहेत. सूर्यकुमारच्‍याआधी दक्षिण आफ्रीका संघातील एबी डिविलियर्स याला ही उपाधी बहाल करण्‍यात आली होती.

Shahid Afridi admires suryakumar : रिजवान आणि सूर्यकुमार  यांची तुलनाच होवू शकत नाही

एका टीव्‍ही कायर्यकम्रात बाोलताना शाहिद आफ्रिदी म्‍हणाला की, " पाकिस्‍तानचा सलामीवीर माोहम्‍मद रिजवान आणि सूर्यकुमार  यांची तुलनाच होवू शकत नाही. सूर्यकुमार याने देशातंर्गत स्‍पर्धेत २०० ते २५० सामने खेळले आहेत. त्‍याला स्‍वत:च्‍या खेळाविषयी माहिती आहे. सूर्यकुमार याला आपल्‍या काय खेळी करायची याची कल्पना आहे. चेंडू पाहूनच तो खेळतो. खेळाडू आपल्‍या क्षमतेनुसारच एक प्रतीभावंत खेळाडू होतो."

रविवारी झिम्‍बाब्‍वे विरुद्ध सूर्यकुमार याने २५ चेंडूत ६१ धावा केल्‍या. तर रिजवान याने बांगलादेश विरुद्‍ध ३२ चेंडूत ३२ धावा केल्‍या होत्या,.

वसीम अक्रम आणि वकार यूनुसही सूर्यकुमारचे फॅन

झिम्‍बाब्‍वे विरुद्ध सामन्‍यात सूर्यकुमारने २५ चेंडूत ६१ धावा केल्‍या. त्‍याने सहा चाौकार आणि चार षटकार फटकावले.
त्‍याच्‍या या खेळीने आता पाकिस्‍तानचे माजी वेगवान गाोलंदाज वसीम अक्रम आणि वकार यूनुस हेही त्‍याचे फॅन झाले .
त्‍यांनी सूर्यकुमारवर स्‍तुतीसुमनांचा वर्षाव केला होता.

सूर्यकुमार दुसर्‍या ग्रहावरुन आला असावा : अक्रम

वसीम अक्रम म्‍हणाले होते की, मला वाटतं सूर्यकुमार हा दुसर्‍या ग्रहावरुन आला असावा. तो अन्‍य फलंदाजांपेक्षा खूपच वेगळा आहे. त्‍याला फलंदाजी करताना पाहणे हा एक आनंददायी अनुभव असतो. तो जगातील सर्वचे वेगवान गोलंदाजांसमोर तो निर्भयपण खेळतो.
वकार यूनुस म्‍हणाले होते की, सूर्यकुमारला गाोलंदाजी करताना तुम्‍ही प्लॅनिंग करु शकत नाही. त्‍याला वन डे आणि कसोटीमध्‍ये तुम्‍ही अआउट करु शकता. मात्र टी-20 खेळात गाोलंदाज हे बॅकफूटवर असतात, सूर्यकुमारसारख्‍या फॅार्ममध्‍ये असलेल्‍या खेळाडूला गाोलंदाजी करणे अवघड होते. त्‍यामुळे पाकिस्‍तानला त्‍याच्‍या विरुद्ध चांगलीच गाोलंदाजी करावी लागले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news