स्त्रियांमधील मधुमेहाची लक्षणे व उपचार

स्त्रियांमधील मधुमेहाची लक्षणे व उपचार
  • डॉ. शुभश्री पाटील,

जगभरातील लक्षावधी व्यक्तींना मधुमेह हा गंभीर विकार आहे. स्त्रियांबाबत ह्या अवस्थेचा परिणाम हार्मोन्सच्या बदलांपासून गरोदरपणाशी निगडित गुंतागुंतींचा समावेश होतो. हा विकार कोणालाही होऊ शकत असला, तरी स्त्रियांमध्ये मधुमेहाशी निगडित जी लक्षणे व धोके दिसून येतात, त्यांच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येणारे मधुमेहाचे लक्षण म्हणजे योनीमार्गातील यीस्ट प्रादुर्भाव होय. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे योनीमार्गात बुरशीसद़ृश (यीस्ट) घटकाच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते. ह्यामुळे खाज सुटणे, जळजळ होणे व योनीमार्गातून स्राव होणे आदी समस्या निर्माण होतात.

मूत्रमार्गातील प्रादुर्भाव (यूटीआय) हे स्त्रियांमधील मधुमेहाचे आणखी एक लक्षण आहे. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे मूत्रमार्गात जीवाणूंच्या वाढीला पोषक वातावरण निर्माण होते. ह्या प्रादुर्भावामुळे ताप येऊ शकतो, वारंवार लघवीला जावे लागते आणि लघवीच्या वेळेस वेदना होतात.

मासिक पाळी आणि रजोनिवृत्तीच्या काळात होणार्‍या हार्मोन्सच्या बदलांमुळेही मधुमेही स्त्रियांमध्ये रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. ह्यामुळे मूड्स (चित्तवृत्ती) बदलणे, थकवा व भूकेच्या प्रवृत्तीत बदल असे परिणाम होऊ शकतात.
मधुमेही स्त्रियांमध्ये हृदयविकार, पक्षाघात, लैंगिक बिघाड आणि अंधत्व यासारख्या गुंतागुंती होण्याची शक्यता अधिक असते; ह्याचे कारण म्हणजे मधुमेह शरीरभरातील छोट्या रक्तवाहिन्यांवर परिणाम करतो आणि स्त्रियांचे शरीर ह्या परिणामांना बळी पडण्याची शक्यता अधिक असते.

मधुमेह असलेल्या गरोदर स्त्रियांना धोक्यांना तोंड द्यावे लागते. प्री-एक्लम्प्सियासारखे धोके त्यांना अधिक असतात. यामुळे आई व मूल दोघांमध्ये गंभीर जटीलता निर्माण होऊ शकतात. म्हणूनच मधुमेही स्त्री गरोदर असताना तिच्यावर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक असते.

स्त्रियांमधील मधुमेह व उपचार

ज्या स्त्रियांच्या कुटुंबातील व्यक्तींना मधुमेह असतो, ज्यांचे वजन अधिक असते किंवा ज्यांना पोलिसिस्टिक ओव्हरी सिण्ड्रोम (पीसीओएस) असतो त्यांना मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो. निदानासाठी रक्तातील साखरेची पातळी मोजणारी रक्तचाचणी केली जाते. मधुमेहाची लक्षणे किंवा धोका असलेल्या स्त्रियांनी ह्या विकाराचे लवकर निदान होण्यासाठी नियमित चाचणी करवून घ्यावी आणि गुंतागुंती टाळाव्यात. स्त्रियांमधील मधुमेहाच्या उपचारांमध्ये जीवनशैलीत बदल केले जातात. आहारात बदल व व्यायाम तसेच ध्यानाच्या माध्यमातून रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण मिळवले जाऊ शकते. ह्या प्रयत्नांना शरीराचे वजन निरोगी राखणे, गोड व प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ टाळणे आणि नियमितपणे शारीरिक व्यायाम करत राहणे ह्यांचा समावेश होतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news