स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात दिल्लीच्या नायब राज्यपालांची उडी

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात दिल्लीच्या नायब राज्यपालांची उडी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात दिल्लीच्या नायब राज्यपालांनी उडी घेतल्याने या प्रकरणात भाजपचे षडयंत्र असल्याचे स्पष्ट झाल्याचा आरोप मंगळवारी (दि.२१) आम आदमी पक्षाने केला आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभवकुमार यांनी केलेली मारहाण लाजीरवाणी आहे. मात्र, या मुद्यावर शांत राहून दिल्लीचे सरकार आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी असंवेदनशीलता दाखवली असल्याचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी म्हटले आहे. स्वाती मालीवाल यांनी वेळोवेळी माझा विरोध केला, तरीही त्यांच्यासोबत झालेली घटना अस्वीकार्य आणि अक्षम्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news