‘स्वराज्य’च्या पहिल्या अधिवेशनात संभाजीराजेंनी केली मोठी घोषणा, म्हणाले २०२४ ला…

‘स्वराज्य’च्या पहिल्या अधिवेशनात संभाजीराजेंनी केली मोठी घोषणा, म्हणाले २०२४ ला…

पुढारी ऑनलाईन: संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन पुणे शह, रातील बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडलं. या अधिवेशनात २०२४ ला होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबद्दल संभाजीराजे छत्रपती यांनी मोठी घोषणा केली आहे. २०२४ साली होणाऱ्या निवडणुका ताकदीने लढणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात "स्वराज्य यापुढे सक्षम पर्याय म्हणून येणार आहे. त्यामुळे २०२४ ला होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागा. कोणालाही घाबरण्याची गरज नाही. मला विश्वास आहे, सुसंस्कृत नेता स्वराज्यात येणारचं. यावेळी आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुण घ्यायचे आहेत," असेही संभाजीराजेंनी सांगितलं आहे.

"आजचे काही प्रस्थापित लोक माजलेले आहेत. त्या प्रस्थापितांना माझा विरोध आहे. परंतु, चूक त्यांची नसून आपली आहे. कारण, आपणच त्यांना निवडून देतो. नंतर माजल्यानंतर तो म्हणतो बघून घेऊ. मग, अगोदरच का निवडून देता?," असा प्रश्न संभाजीराजेंनी केला आहे.

लोकांना "शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि महासंताचं नाव घेत येड्यात काढलं जातं. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. स्वराज्यच्या माध्यमातून जनजागृती करत आपल्याला सामान्य शेतकऱ्यांना ताकद देण्याचं काम करायचं आहे," असं संभाजीराजेंनी सांगितलं. सुरुवातीला "मला अनेक लोक विचारत होते, स्वराज्यचं ब्रीदवाक्य आणि बोधचिन्ह काय आहे? पण, आम्हा सर्वांना वाटलं, स्वराज्य नावातच एवढी ताकद आहे, की त्याला ब्रीदवाक्य आणि बोधचिन्ह ठेवण्याची गरज नाही," असेही संभाजीराजेंनी म्हटलं.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news