Sushmita Sen : सुश्मितासाठी प्रियकराने सोडली होती नोकरी

sushmita sen
sushmita sen
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : १९९४ मध्ये मिस युनिव्हर्सचा मुकूट जिंकत अभिनेत्री सुश्मिता सेनने भारताचे नाव जगभरात गाजवले. अभिनयाच्या जोरावर तिने बॉलीवूडनध्ये स्थान निर्माण केले आहे. सध्या सोशल मीडियावर सुश्मिताच्या पहिल्या प्रियकराची चर्चा रंगली आहे. त्याने सुश्मितासाठी चक्क त्याची नोकरी सोडली होती. गेल्या काही वर्षांत सुश्मिताचे नाव अनेक दिग्गज व्यक्तींसोबत जोडले गेले.

मात्र, एकेकाळी ती व्यक्ती रजत तारावर जीवापाड प्रेम करत होती. सुश्मिता मिस युनिव्हर्स व्हावी, यासाठी त्याने चक्क त्याची नोकरी सोडली होती. त्यावेळी घेण्यात आलेल्या एका मुलाखतीत तिने रजत ताराविषयी भाष्य केले होते. आता सोशल मीडियावर सुश्मिताचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या ती फारुक शेख यांच्या 'जीना इसी का नाम हैं' या टॉक शोमध्ये सहभागी झाली होती.

सुश्मिता म्हणाली होती की, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. माझा प्रियकर रजत हा माझ्या आयुष्यातील खूप खास व्यक्ती आहे. कारण, मी मिस इंडिया जिंकले आणि मला मिस युनिव्हर्ससाठीचे प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबईला यावे लागले. मला मुंबईला जायचे नाही म्हणून मी रडायला लागले. त्यावेळी रजतने त्याची नोकरी सोडली आणि तो माझ्यासोबत मुंबईला आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news