पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव जबरदस्त खेळी करत दमदार शतक ठोकले. त्याने आजच्या सामन्यात किवी गोलंदाजांची अक्षरश: धो धो धुलाई केली. त्याच्या या फलंदाजीवर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन मंत्रमुग्ध झाला आहे. ( Kane Williamson on Suryakumar ) त्याने सूर्यकुमारवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
सूर्यकुमारच्या आजच्या खेळीबाबत केन विल्यमसन म्हणाला की, "सूर्यकुमार यादवने आज केलेली नाबाद 111 धावांची खेळी ही मी आजवर पाहिलेली सर्वोत्तम खेळी आहे. ही या जगातीलखेळीच नाही असे मला क्षणभर वाटलं. मी पाहिलेल्या सर्वोत्तम खेळींपैकी ती एक होती. आज त्याने मारलेले फटके मी क्रिकेटमध्ये यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. ते उत्कृष्ट होते."
आजच्या सामन्यात आमच्या गोलंदाजांच्या चेंडूला गती मिळाली नाही. त्यामुळे आम्ही विकेट मिळाल्या नाहीत. हे निराशाजनक होते. मात्र सूर्यकुमारची खेळी ही उत्कृष्ट होती. तो जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. भारताने शेवटच्या पाच षटकांमध्ये 72 धावा केल्या. सूर्यकुमारमुळे हे शक्य झाले. त्याने लॉकी फर्ग्युसन, ॲडम मिल्ने आणि टिम साउथी यांच्याविरुद्ध उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले, असेही केन विल्यमसन यांनी नमूद केले.
या सामन्यात सूर्यकुमार यादवने 51 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या आणि त्यादरम्यान त्याने 7 षटकार आणि 11 चौकार लगावले. त्याचा स्ट्राइक रेट 217.65 होता आणि हे त्याच्या टी 20 कारकिर्दीतील दुसरे शतक ठरले. या खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकांत 6 गडी गमावून 191 धावा केल्या.
शेवटच्या पाच षटकांमध्ये सूर्यकुमार यादवने कहर केला आणि मैदानाच्या चौफेर फटकेवाजी केली. या वादळी खेळीच्या जोरावर त्याने 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते, तर त्याचे शतक 49 चेंडूत पूर्ण केले. तसेच, डावाच्या शेवटी त्याने 51 चेंडूत 111 धावा केल्या. त्याने आपल्या डावातील शेवटच्या 19 चेंडूंमध्ये 61 धावा वसूल केल्या.
• 122- विराट कोहली
• 118- रोहित शर्मा
• 117- सूर्यकुमार यादव
• 111- सूर्यकुमार यादव
• 111- रोहित शर्मा
• सूर्यकुमार यादव – 111
• कॉलिन मुनरो – 109
सूर्यकुमार यादव – 30 सामने, 1151 धावा, 47.95 सरासरी, 2 शतके, 9 अर्धशतके, 105 चौकार, 67 षटकार
मोहम्मद रिझवान – 25 सामने, 996 धावा, 45.27 सरासरी, 10 अर्धशतक, 78 चौकार, 22 षटकार